जम्मू -काश्मीर विधानसभेत राज्याच्या दर्जावरुन गोंधळ   

प्रस्तावाला विरोध; भाजपचा सभात्याग

जम्मू : केंद्रशासित जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा द्यावा, अशी मागणीं करणारा प्रस्ताव मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी सोमवारी विधानसभेत मांडला होता. त्या प्रस्तावाला भाजपने जोरदार विरोध केला. तसेच या विषयावरुन सभात्याग केला. 
 
केंद्र सरकारने यापूर्वी ३७० कलम हटवले होते. नंतर जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेश बनले होते. आता पुन्हा राज्याचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या नॅशनल कॉन्फरन्सचे सरकार आहे. या सरकारच्या वतीने मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी दर्जा देण्याची मागणी करणारा प्रस्ताव विधानसभेत मांडला आहे. त्याला प्रमुख विरोधी पक्ष भाजपने विरोध करत सभात्याग केला.

Related Articles