E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
अग्निवीरांना शासकीय सेवेत मिळणार दहा टक्के आरक्षण
Samruddhi Dhayagude
30 Sep 2026
राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय; परीक्षा-प्रशिक्षणाची अट नाही
मुंबई, (प्रतिनिधी) : चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून परतणार्या अग्निवीरांना महाराष्ट्राच्या विविध शासकीय सेवांमध्ये सामावून घेण्यासाठी राज्यात दहा टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार, पोलिस तसेच तत्सम विविध पदांवर अग्निवीरांना संधी दिली जाणार असून, त्यांच्यासाठी स्वतंत्र परीक्षा किंवा प्रशिक्षणाची अट ठेवली जाणार नाही. तसेच, वयोमर्यादेत चार वर्षांची सवलत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
केंद्र सरकारच्या अग्निवीर योजनेनुसार २५ टक्के अग्निवीरांना सैन्यदलात कायम ठेवले जाणार असून, उर्वरित ७५ टक्के अग्निवीरांना केंद्र व राज्य सरकारच्या विविध दलांमध्ये संधी देण्याची भूमिका आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राने राज्यातील अग्निवीरांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे. अग्निवीरांनी आधीच निवड प्रक्रिया आणि प्रशिक्षण पूर्ण केलेले असल्याने त्यांना पुन्हा परीक्षा किंवा प्राथमिक प्रशिक्षणाची अट लागू केली जाणार नाही. संबंधित पदाच्या स्वरूपानुसार आवश्यक प्रशिक्षणाची गरज असल्यास ते प्रशिक्षण देण्यात येईल. उदाहरणार्थ, अग्निशमन दलात नियुक्ती अग्निवीरांना संबंधित सेवेसाठी आवश्यक प्रशिक्षण घ्यावे लागेल, असे फडणवीस यांनी सांगितले.
अग्निवीरांना राज्य सेवेत सामावून घेताना पदांची संख्या अपुरी पडल्यास अतिरिक्त पदे निर्माण करण्याचाही निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे शासन सेवेत येऊ इच्छिणार्या जास्तीत जास्त अग्निवीरांना संधी देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
विशेषतः नौदलातून परतणार्या अग्निवीरांचा कोस्टल सिक्युरिटीमध्ये उपयोग करून घेण्यात येणार असून, महाराष्ट्राच्या सागरी सुरक्षेसाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने पदसंख्येबाबत शिथिलता देऊन इच्छुक अग्निवीरांना या सेवेत सामावून घेतले जाईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
माजी सैनिकांच्या श्रेणीतील रिकाम्या पदांवरही प्राधान्य
माजी सैनिकांच्या श्रेणीतील रिकाम्या पदांवरही अग्निवीरांना प्राधान्य देण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. अग्निवीरांचा अनुभव आणि प्रशिक्षण राज्याच्या विविध सेवांसाठी उपयोगात आणला जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
Related
Articles
‘नाना’ हे विचारांचे मोहोळ; बळकट आवाज हरपला
09 Oct 2026
आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा सपकाळ यांचा आरोप
04 Oct 2026
दाते मुद्रणालयाला महापौरांच्या आदेशाने टाळे
08 Oct 2026
शरद पवार दुष्काळ पाहणीवर पुरंदर तालुक्यात शेतकर्यांशी संवाद
03 Oct 2026
जिल्हा स्तरावर ५०० विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह
09 Oct 2026
एनसीसीसाठी अकादमीची प्रतीक्षाच!
03 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान