E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
पिके करपलेल्या तालुक्यांनाही दुष्काळी उपाययोजनांचा लाभ
Samruddhi Dhayagude
30 Sep 2026
पाहणीनंतर दुसर्या यादीत होणार समावेश
मुंबई, (प्रतिनिधी) : अनेक तालुक्यांचा ‘ट्रिगर १’ च्या निकषांत बसत नसल्याने पहिल्या यादीत समावेश झालेला नाही. पण, ज्या ठिकाणची पिके करपली आहेत अशा तालुक्यांचा पुन्हा प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी करून दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या दुसर्या यादीत समावेश करण्यात येईल. तसेच, पिके करपलेली आहेत; परंतु ‘ट्रिगर १’ च्या पहिल्या निकषात न बसलेल्या या तालुक्यांना दुष्काळी उपाययोजनांचे लाभ दिले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली.
काल मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक मंत्र्यांनी दुष्काळी तालुक्यांच्या यादीत अनेक तालुक्यांचा समावेश झाला नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर तांत्रिक बाबींमुळे कोणत्याही शेतकर्यावर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
यावेळची स्थिती विचित्र आहे. पहिले दोन महिने पाऊस झाला, त्यानंतर दोन महिने पाऊस झाला नाही. अशी स्थिती साधारणतः कधी होत नाही. त्यामुळे अशा तालुक्यांत प्रत्यक्ष गावागावांत जाऊन पाहणी करण्यात येईल. पिकांची करपलेली अवस्था पाहून त्यांना दुष्काळाचा फायदा द्यायचा, अशी कार्यप्रणाली ठरवण्यात आली आहे. या संदर्भात उपसमिती पाहणी करेल. ज्या तालुक्यांत खरोखर पिके करपली आहेत; पण पहिल्या यादीत ज्यांचे नाव नाही अशांचा निश्चितच
दुसर्या यादीत समावेश केला जाईल. त्या तालुक्यांना दुष्काळाचे सर्व फायदे दिले जातील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत नेमलेल्या समितीचा अहवाल आला आहे. पण, त्यानंतर काही प्रश्न निर्माण झाले. वेगवेगळ्या समाजाच्या शिष्टमंडळांनी भेटून अर्ज दिले आहेत. या अर्जांचा विचार करण्यासाठी मुख्य सचिवांची समिती नेमली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे उपवर्गीकरण करताना कोणत्याही जाती-जातीत तेढ निर्माण न होता तसेच कोणावरही अन्याय न होता उपवर्गीकरण झाले पाहिजे, अशी सरकारची भूमिका आहे. अनुसूचित जातीतील ज्या समाजाला आरक्षणाचा लाभ मिळाला नाही, त्यांना त्याचा लाभ कसा मिळेल यासाठी सर्वसहमती तयार करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्र्यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
मोर्चाची उडवली खिल्ली...
लोकशाहीत आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे. त्यामुळे कोण आंदोलन करतोय म्हणून आम्ही टीका करणार नाही; परंतु, ज्या मुद्द्यावर आंदोलन करताय तो मुद्दा किती खरा आहे हे समजून घेतले पाहिजे. आपण जी उदाहरणे देतो तेही समजून घेतले पाहिजे. यापेक्षा जास्त बोलण्याची गरज नाही, अशा शब्दांत फडणवीस यांनी ठाकरे बंधूंच्या निवडणूक आयोगाच्या विरोधातील मोर्चाची खिल्ली उडवली.
Related
Articles
बांगलादेशाच्या हसन महमूदने ऐतिहासिक कामगिरी
12 Oct 2026
अंबानी यांनी भाजपला देणग्या देण्याबरोबर प्रचारही जोमाने केला
11 Oct 2026
दिव्यांग विद्यार्थ्यांना घडविणार्या शिक्षकांचा गौरव
08 Oct 2026
आधी नियोजन, आता निधी कपात; जिल्हा परिषदेत सदस्यांची कोंडी
13 Oct 2026
लडाख भारताचा अविभाज्य भाग
14 Oct 2026
रूम रेंट, को-पेमेंट आणि डिडक्टिबल्स
12 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात