E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
बुलेट ट्रेनचा पोलादी पूल ठाण्यात उभारला
Samruddhi Dhayagude
30 Sep 2026
वजन १ हजार ४०५ टन, १०० मीटर लांबी अणि १४ मीटर उंंच
ठाणे : केंद्र सरकारचा मुंबई ते अहमदाबाद हा महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेनचा प्रकल्प पुढे सरकत आहे. त्या अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वर दिवे-अंजूर गावात सोमवारी अवाढव्य पोलादी पूल उभारण्यात आला आहे.
पुलाचे वजन १ हजार ४०५ टन, लांबी १०० मीटर असून उंची १४ मीटर आहे. राज्यात बुलेट ट्रेन प्रकल्पाचा हा पूल आहे. हा पूल मुंबईपासून १ हजार ३०० किलोमीटरवरील तामिळनाडुतील त्रिचीतील कार्यशाळेत तयार केला होता. नंतर तो आणून तो निश्चित स्थळी बसविण्यात आला आहे. याबाबतची माहिती राष्ट्रीय अतिवेगवान रेल्वे महामंडळाने दिली. बुलेट ट्रेन धावणार्या मार्गावर २८ पूल उभारण्यात येणार आहे. त्यापैकी १६ पूल उभारले गेले आहेत. सर्व पूल त्रिचीतील विशेष कार्यशाळेत मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत तयार केले आहेत. त्रिची येथून पुलाचे भाग आणले गेले आणि ठाण्यामध्ये ते जोडून आता उभारला आहे.
दरम्यान, मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचा प्रकल्प देशातील पहिला असून तो ५०८ किलोमीटरचा आहे. त्याद्वारे दोन शहरे आणि दोन राज्ये अनुक्रमे महाराष्ट्र आणि गुजरात जोडली जाणार आहेत. वेगवान प्रवासामुळे प्रवाशांचा वेळही वाचणार आहे.
प्रकल्प : बुलेट ट्रेन
मार्ग : मुंबई ते अहमदाबाद
अंतर : ५०८ किलोमीटर
पुलाची निर्मिती : त्रिची (तामिळनाडू)
बनावट : स्वदेशी, मेक इन इंडिया उपक्रम
एकूण पूल : २८
उभारले पूल : १६
Related
Articles
अमेरिकन सैनिकाकडून जपानमध्ये महिलेचा खून
07 Oct 2026
कालिनिनग्राडवर हल्ला झाल्यास अण्वस्त्रांसह सर्व शस्त्रांचा वापर
04 Oct 2026
मुकेश-आकाशची भेदक गोलंदाजी शेष भारताला विजेतेपद
05 Oct 2026
विविध कार्यक्रमांनी रंगणार चतुःशृंगी देवीचा नवरात्रोत्सव
08 Oct 2026
पीएमआरडीएमध्ये नवी कार्यपद्धती; रस्त्यांच्या जोडणीसाठी एकसमान कार्यपद्धती
05 Oct 2026
मार्केटयार्डात ‘नो यूपीआय’आंदोलन यशस्वी
03 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान