सारथी संस्थेला १२२ कोटी मंजूर वसतिगृहाच्या कामाला गती देणार   

मुंबई, (प्रतिनिधी) : मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांच्या बांधकामासाठी  छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था अर्थात ‘सारथी’ला १२२ कोटी ३४ लाख तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला  १५० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती  जलसंपदा मंत्री व मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना  शैक्षणिक आणि  सामाजिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मराठा समाजातील ५०० विद्यार्थी आणि ५०० विद्यार्थिनी या क्षमतेच्या आठ वसतिगृहांच्या उभारणीचे काम पूर्णत्वास जात आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून ही वसतिगृहे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होतील, अशा दृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याचे विखे-पाटील यांनी सांगितले.
 
अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळासाठी  ७५० कोटींची अंदाजपत्रकी तरतूद करण्यात आलेली आहे. यापूर्वी महामंडळाला  ४५० कोटींचा निधी उपलब्ध झाला होता. आता आणखी  १५० कोटी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

Related Articles