E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधूंचा रविवारी मोर्चा
Samruddhi Dhayagude
30 Sep 2026
मुंबई, (प्रतिनिधी) : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा मनमानी कारभार दोन आयुक्तांनीच समोर आणल्याने देशभरातील राजकारण तापले आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे ज्ञानेश कुमार यांच्या हकालपट्टीसाठी एकत्र लढा पुकारला असून, ४ ऑक्टोबरला (रविवारी) मुंबईत संयुक्त मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे.
कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधातील हा मोर्चा नसून, निवडणूक आयोगाच्या मागील काही वर्षांतील कारभाराविरोधातील मोर्चा आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी नागरिकांनी हातात तिरंगा घेऊन मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन उद्धव व राज यांनी मंगळवारी संयुक्त पत्रकार परिषदेत केले. या मोर्चासाठी सर्व राजकीय पक्षांना निमंत्रित केले जाणार असून, सर्वांच्या हातात पक्षाचा झेंडा नाही तर केवळ तिरंगा असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात संपूर्ण देशात संतापाचा उद्रेक झाला असून, विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन केले जात आहे. काँग्रेस पाठोपाठ आता ठाकरे बंधूंनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव आणि राज यांनी काल ’शिवतीर्थ’ येथे संयुक्त पत्रकार परिषद घेऊन मोर्चाची रूपरेषा स्पष्ट केली.
४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता भायखळा येथून मोर्चाला सुरुवात होणार असून, तो फोर्ट येथील मुंबई महापालिका मुख्यालयाच्या दिशेने जाणार आहे. महापालिकेसमोर मोर्चाचे सभेत रूपांतर होईल. या सभेत आयोगाच्या कारभाराबाबत सविस्तर भूमिका मांडली जाणार असल्याचे राज यांनी सांगितले.
Related
Articles
कालिनिनग्राडवर हल्ला झाल्यास अण्वस्त्रांसह सर्व शस्त्रांचा वापर
04 Oct 2026
अभिषेक, शुभमन, शेफाली, चरणी यांना नामांकन
07 Oct 2026
शिक्षणसंस्थांना अधिक स्वायत्तता देणे आवश्यक : डॉ. अनिल काकोडकर
05 Oct 2026
सुग्रीवामुळे कुंभकर्णाला मिळाले जीवदान
05 Oct 2026
मुंबईच्या रणजी संघातून सूर्यकुमारला वगळले
07 Oct 2026
पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात चोरी
06 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान