E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
सातार्यात ४५ गावे आणि २७९ वाड्या तहानलेल्या
Samruddhi Dhayagude
30 Sep 2026
सुमारे ४३ टँकरने पाणीपुरवठा; टँकर वाढण्याची शक्यता
सातारा, (वार्ताहर) : सातारा जिल्ह्यात पावसाळा सुरू असतानाही काही भागात पाणी टंचाईचे संकट कायम असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील ४५ गावे आणि २७९ वाड्या-वस्त्यांना पाणीटंचाईची तीव्र झळ बसत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. दिवसेंदिवस कडक ऊन पडत असल्याने टँकर आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सध्या कडक ऊन आणवत आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या काही गावांमधील विहिरी, कूपनलिका तसेच अन्य पाणीपुरवठा स्रोतांची पाणीपातळी खालावल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. ग्रामीण भागातील महिला व नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. काही ठिकाणी नियमित पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी होत आहे. माण तालुक्यातील बिजवडी, पाचवड, पांगरी, वेळेवाडी, मोगराळे, वडगाव, जाधववाडी, राजवडी, तोंडले, अनमुलेवाडी, थदाळे, मोही, दानवलेवाडी, हस्तनपूर, डंगिरेवाडी, वावरहिरे, संभूखेड, वरकुटे म्हसवड, शिरताव, रांजणी, धुळदेव, पळशी, माहीं, इंजबाव, भालवडी, वाकी, विरळी, कुरणेवाडी, वारुगड, परकंदी, टाकेवाडी, सुरूपखानवाडी, दोरगेवाडी, पुकळेवाडी, कुकुडवाड यासह ३५ गावे व २३२ वाड्या वस्त्यांमधील ५६ हजार १५७ नागरिक व ५१ हजार ६७२ जनावरांना ३५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
खटाव तालुक्यातील मोराळे, एनकूळ, कणसेवाडी, खातवळ, यलमवाडी, गारवडी (आवळेपठार) पडळ यांसह ७ गावे व ३६ वाड्यांमधील ७ हजार ८३३ नागरिक व २ हजार १३५ जनावरांना ४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. फलटण तालुक्यातील नाईकबोमवाडी, सासवड (माळीबंद), गोळेगाव या तीन गावांमधील २२२२ नागरिक व १०१५ जनावरांना चार टँकरने पाणीपुवठा केला जात आहे.
Related
Articles
होर्मुजमध्ये तेलवाहू जहाजावर हल्ला
03 Oct 2026
चार वर्षांत प्रथमच रेपो दरात वाढ
08 Oct 2026
वैमानिक स्मित मच्छार जागतिक नायक : नेतन्याहू
05 Oct 2026
पृथ्वी शॉ महाराष्ट्राचा कर्णधार; रणजीत नेतृत्वाची धुरा
06 Oct 2026
पाकिस्तानात धार्मिक स्थळांच्या सुरक्षेची मागणी
09 Oct 2026
पवना धरण तुडुंब तरीही पिंपरी-चिंचवडच्या ३४ सोसायट्यांना टँकरचा आधार!
05 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान