E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
लेण्याद्रीत अंगारकीनिमित्त गर्दी
Samruddhi Dhayagude
30 Sep 2026
लेण्याद्री, (वार्ताहर) : अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त अष्टविनायक तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र लेण्याद्री (ता. जुन्नर) येथील ‘श्री गिरीजात्मज’ गणपतीचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले. भाद्रपद महिन्यातील अंगारक संकष्टी चतुर्थी आल्याने व या चतुर्थीला विशेष महत्त्व असल्याने दिवसभर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. श्री क्षेत्र लेण्याद्री परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. यानिमित्ताने ‘श्री गिरिजात्मज’ गणेशाच्या मूर्तीस व मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
श्री लेण्याद्री गणपती देवस्थानचे वतीने पहाटे ०६.१५ वाजता देवस्थानचे अध्यक्ष संजय ढेकणे, विश्वस्त सदाशिव ताम्हाणे व कैलास लोखंडे यांच्या हस्ते श्रींचा विधीवत अभिषेक व महापूजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. यानिमित्त ‘श्री गिरिजात्मज’ गणेशाच्या मूर्तीस व मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. देवाचे नैवेद्याकरिता गोळेगाव येथील कैलास लक्ष्मण लोखंडे यांनी १ कॅरेट पेरु, गोळेगाव येथील सचिन सदाशिव ताम्हाणे यांनी २ कॅरेट पपई, नारायणगाव येथील संजय महादेव बनकर, दौंड येथील सरस्वती अष्टविनायक ग्रुप, गोळेगाव येथील संदेश उत्तम लोखंडे व महेश अशोक सरजिने यांनी प्रत्येकी २ कॅरेट केळी तसेच कुमशेत येथील अंकुश जालिंदर डोके यांनी १ कॅरेट केळी प्रसाद दिला.
मंदिरात सकाळी ७ वाजता, दुपारी १२ वाजता व सायंकाळी ७ वाजता महाआरती करण्यात आली. अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त देवस्थानचे वतीने दिवसभर विविध धार्मिक विधी करण्यात आले. भाविकांना देवस्थान ट्रस्ट मार्फत विविध सोयी सुविधा पुरविण्यात आल्या. तसेच यानिमित्ताने लक्ष्मण केरु भोसले यांच्या स्मरणार्थ वारकरी संप्रदाय यांजकडून भाविक भक्तांकरिता खिचडी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. अंगारक संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व असल्याने दिवसभर भाविकांची व पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. भाविक व पर्यटकांचे देव दर्शन सुलभ व्हावे याकरिता गर्दीचे नियोजन देवस्थान ट्रस्टच्यावतीने करण्यात आले होते. तसेच यानिमित्ताने देवस्थान ट्रस्ट व शिवनेरी ब्लड सेंटर यांचे संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी देवस्थानचे अध्यक्ष संजय ढेकणे, उपाध्यक्ष गोविंद मेहेर, सेक्रेटरी शंकर ताम्हाणे, खजिनदार भगवान हांडे, विश्वस्त मच्छिंद्र शेटे, सदाशिव ताम्हाणे, काशिनाथ लोखंडे, जयवंत डोके, जितेंद्र बिडवई, कार्यालयीन सचिव रोहीदास बिडवई, व्यवस्थापक निलेश सरजिने, कर्मचारी, गोळेगाव ग्रामस्थ तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Related
Articles
तब्बल दहा वर्ष तरूण कोठडीत आरोपी म्हणून जगला!
05 Oct 2026
आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धा
09 Oct 2026
नीरू समारोप सोहळ्यात भारताची ध्वजवाहक
03 Oct 2026
मलेशियाने म्यानमारच्या दीड हजार नागरिकांना मायदेशी पाठवले
05 Oct 2026
पितृ पंधरवाड्यामुळे फळभाज्यांना मागणी वाढली
03 Oct 2026
इंद्रायणीच्या काठावर अश्रूंचा पूर; विद्यार्थ्यांना अखेरचा निरोप
03 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान