E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शाळेच्या प्रवेशद्वारासमोरच तुंबलेले गटार
Samruddhi Dhayagude
30 Sep 2026
मिरजगाव (वार्ताहर) : येथील नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच गटार तुंबल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त घाण पाणी साचले आहे. गटाराची साफसफाई न झाल्याने हे पाणी थेट रस्त्यावर आले असून, विद्यार्थ्यांना याच घाण पाण्यातून शाळेत जावे लागत आहे.
शाळा व्यवस्थापनाने ग्रामपंचायतीकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही अद्याप ठोस उपाययोजना झालेली नसल्याने पालक व ग्रामस्थांमध्ये संताप आहे. या रस्त्याने दररोज शेकडो विद्यार्थी ये-जा करतात. प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांना गुडघ्यापर्यंत पाण्यातून वाट काढावी लागत असून, माध्यमिकच्या मुलींना चिखल व काट्याकुट्यातून कसरत करावी लागत आहे. घसरून दुखापत होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.
घाण पाणी घरांमध्ये शिरत असून, डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. गावात इतरत्र पेव्ींग ब्लॉक बसविले असताना शाळेजवळील वर्दळीच्या रस्त्यावर ते न टाकल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. साथीचे रोग पसरण्यापूर्वी गटाराची तातडीने साफसफाई करून कायमस्वरूपी पाण्याचा निचरा करावा व ग्रामपंचायतीकडे वारंवार पाठपुरावा करूनही समस्या कायम आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी पालक, शिक्षक व ग्रामस्थांनी केली आहे.
Related
Articles
पुणे बुक फेअरचे प्रसेनजीत फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
08 Oct 2026
तुळजापुरात ‘आई राजा उदो उदो’चा जयघोष
12 Oct 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना शुल्कमाफीचा आधार; विद्यापीठांत मदतीसाठी स्वतंत्र यंत्रणा
14 Oct 2026
जगाची व जगण्याची जाण असलेला ‘क्रांतीवीर’ अभिनेता
09 Oct 2026
शुभमन आणि शेफाली सर्वोत्तम क्रिकेटपटू
14 Oct 2026
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात पुणे जिल्हा परिषद राज्यात द्वितीय
12 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात