E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन आठ दिवसांत अहवाल सादर करा
Samruddhi Dhayagude
30 Sep 2026
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या सूचना
सोलापूर, (प्रतिनिधी) : राज्य सरकारने खरीप हंगाम २०२६ मध्ये ट्रिगर-१ नुसार दुष्काळ जाहीर केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये हा निर्णय लागू झाला आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकर्यांना तातडीने मदत मिळण्यासाठी महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाच्या अधिकारी-कर्मचार्यांनी प्रत्येक शेतकर्याच्या बांधावर जाऊन शंभर टक्के शेती क्षेत्राच्या नुकसानीचे पंचनामे पुढील आठ दिवसांत पूर्ण करून अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात २०२६ खरीप हंगामातील ट्रिगर-१ दुष्काळाच्या अनुषंगाने विविध उपाययोजना करण्याबाबत आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कार्तिकेयन मार्गदर्शन करत होते. या बैठकीस अपर जिल्हाधिकारी गणेश निर्हाळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, उपजिल्हाधिकारी (महसूल) लक्ष्मण कसेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार पडोळे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) अंजली मरोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) सूर्यकांत भुजबळ, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख श्री. मगर, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अनिल तांबे, विशाल येवले यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी व विभागप्रमुख उपस्थित होते.
कार्तिकेयन म्हणाले, जिल्ह्यातील ११ पैकी ११ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला असून, शेतकर्यांना तातडीने मदत मिळण्यासाठी सरसकट पंचनामे करा. एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्या. पंचनाम्याचा अहवाल आठ दिवसांत सादर करा. सद्यस्थितीत पंचनामे करताना १० टक्के नमुना पाहणी न करता प्रत्येक शेतात, प्रत्येक बांधावर जाऊन जे नुकसान दिसेल, ते सर्व पंचनाम्यात नोंदवावे. तसेच जिओ-टॅगिंगसह पंचनामे करावेत, असेही त्यांनी सूचित केले.
एसआयआरचे काम असलेल्या अधिकारी-कर्मचार्यांनी एसआयआरचे काम दोन दिवस वगळता उर्वरित सर्व वेळ पंचनाम्याच्या कामालाच प्राधान्य द्यावे. सर्व तहसीलदारांनी ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी व कृषी सहाय्यक यांचे आदेश आजच काढावेत. सर्व गावांमध्ये पंचनामे पूर्ण गतीने सुरू करावेत. चुकीचे पंचनामे करू नयेत. दररोज सायंकाळी एकूण क्षेत्र व झालेले पंचनामे यांचा गोषवारा सादर करावा. तसेच सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि प्रांताधिकारी यांनी कोणत्याही परिस्थितीत टँकर मागणीचा प्रस्ताव आल्यास त्यास ४८ तासांत मंजुरी मिळेल, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिले.
गावामध्ये टँकर प्रस्तावाला मंजुरी देताना रस्ते लहान असतील तर मोठ्या टँकरऐवजी छोटा टँकर देण्याबाबत विचार व्हावा. टँकर मागणीचे प्रस्ताव टपालामध्ये न देता संबंधित अधिकार्याकडे तात्काळ उपलब्ध करून द्यावेत. गावामध्ये एकाच ठिकाणी टँकर उभा करून त्या ठिकाणाहून पाणी वितरण करावे. टँकरला जीपीएस बसविलेला असला पाहिजे. टँकरच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास २४ तासांच्या आत त्या गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला पाहिजे, या दृष्टीने नियोजन करावे.
सोलापूर जिल्ह्यात सध्या एकूण ९२ गावांमध्ये टंचाई उपाययोजना मंजूर आहेत. यात बार्शी तालुक्यात १२ गावांमध्ये २ टँकर मंजूर असून, ५ विहिरी व ५ बोअर अधिग्रहित करण्यात आले आहेत. करमाळा तालुक्यात ११ गावांमध्ये ८ टँकर, ८ विहिरी व २ बोअर मंजूर आहेत. मंगळवेढा तालुक्यात सर्वाधिक १६ गावांमध्ये १८ टँकर मंजूर असून, विहीर व बोअर अधिग्रहण नाही. मोहोळ व पंढरपूर तालुक्यांमध्ये सध्या एकही टँकर, विहीर किंवा बोअर मंजूर नाही. उत्तर सोलापूर तालुक्यात ५ गावांमध्ये ७ टँकर मंजूर आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यात १ गावासाठी १ टँकर मंजूर आहे. सांगोला तालुक्यात १९ गावांमध्ये सर्वाधिक २४ टँकर मंजूर असून, विहीर/बोअर अधिग्रहण नाही. माढा तालुक्यात १३ गावांमध्ये १३ टँकर, १० विहिरी व ३ बोअर मंजूर आहेत. अक्कलकोट तालुक्यात ८ गावांमध्ये २ टँकर, ३ विहिरी व ३ बोअर मंजूर आहेत. माळशिरस तालुक्यात ७ गावांमध्ये ७ टँकर व ७ विहिरी मंजूर असून, बोअर अधिग्रहण नाही.
Related
Articles
माढा तालुक्यातील ग्रामस्थांकडून शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीचे स्वागत
13 Oct 2026
आत्महत्याग्रस्त माळी कुटुंबाला राजेंद्र राऊत यांनी दिला आधार
08 Oct 2026
बिबट्यांचा मुक्त संचार...
12 Oct 2026
ऐनवेळी प्रश्नपत्रिका तयार कराव्यात
14 Oct 2026
मुख्य निवडणूक अधिकार्यांच्या कार्यालयाबाहेर ‘आप’चे आंदोलन
08 Oct 2026
चार वर्षांत प्रथमच रेपो दरात वाढ
08 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात