E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पीएमआरडीएचे स्वतंत्र अतिक्रमण निर्मूलन पथक
Samruddhi Dhayagude
30 Sep 2026
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो १० ते १२ दिवसांत धावणार; १७ स्थानकांना सीएमआरएसची मंजुरी
पिंपरी : हिंजवडी ते शिवाजीनगर या बहुचर्चित मेट्रो मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले असून, सीएमआरएसने सुचविलेल्या तांत्रिक बाबींची पूर्तता येत्या १० ते १२ दिवसांत पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
पीएमआरडीएच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. चौधरी आणि अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी विविध प्रकल्पांची माहिती दिली.
माण-हिंजवडी ते शिवाजीनगर हा २३ किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग असून, त्यावर २३ स्थानके आहेत. यापैकी १७ स्थानकांसह संपूर्ण मार्गिकेला सीएमआरएसची मंजुरी मिळाली आहे.
तांत्रिक पूर्ततेनंतर सेवा सुरू करण्याची तयारी असून, उद्घाटनाचा अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार आहे.हिंजवडीतील प्रवाशांसाठी ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ उपलब्ध करून देण्यासाठी सुमारे ४२६ कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यातील ५० टक्के खर्च पीएमआरडीए आणि ५० टक्के खर्च एमआयडीसी करणार आहे.
दरम्यान, पुणे महानगर प्रदेशातील अनधिकृत होर्डिंग्ज आणि अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र ‘अतिक्रमण निर्मूलन पथक’ स्थापन करण्यात येणार आहे. जानेवारी २०२६ पासून आतापर्यंत १५३ अनधिकृत होर्डिंग्ज आणि ९१९ अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली आहेत.
चाकणमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सात रस्त्यांची कामे सुरू असून, नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत ती पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. मोशी सेक्टर १२ मधील सुमारे साडेसहा हजार घरांचे बांधकाम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करून सोडत काढण्याचे नियोजन आहे. इंद्रायणी व पवना नदी सुधार प्रकल्पांतर्गत अनुक्रमे ९५ आणि १५ नाले इंटरसेप्ट करून सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.
पीएमआरडीएची अतिक्रमणाविरोधात मोहीम
- १५३ अनधिकृत फलक हटविले
- ९१९ अनधिकृत बांधकामांवर कारवाई
- स्वतंत्र पथक लवकरच स्थापन
- अद्ययावत यंत्रसामग्री आणि मनुष्यबळाची उपलब्धता
- रस्ते व आरक्षित जागांवरील अतिक्रमणांवर विशेष लक्ष
Related
Articles
एसआयआर नोटीस आली? घाबरू नका...
03 Oct 2026
मलेशियाने म्यानमारच्या दीड हजार नागरिकांना मायदेशी पाठवले
05 Oct 2026
अमेरिकेच्या लष्करातील अधिकार्यांची संख्या घटणार
04 Oct 2026
ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मुंबई, दिल्लीत आंदोलन
03 Oct 2026
विश्वचषकात भारत-पाकिस्तान तीन वेळा लढतीची शक्यता
03 Oct 2026
दुष्काळी उपाययोजनांसाठी अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती
07 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान