E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पिंपरी-चिंचवड ‘एज्युकेशन हब’च्या संकल्पाला आता संशोधनाची जोड
Samruddhi Dhayagude
30 Sep 2026
चिखलीत ८०० कोटींच्या बॅटरी संशोधन केंद्राची उभारणी
पिंपरी : पिंपरी-चिंचवडला ‘एज्युकेशन हब’ बनवण्याच्या संकल्पाला आता प्रगत संशोधनाची जोड मिळणार आहे. सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ आणि जेएसडब्ल्यू प्रोजेक्ट्स यांच्यात चिखली येथील रिसर्च पार्कमध्ये स्वदेशी बॅटरी संशोधन व विकास केंद्र उभारण्यासाठी सामंजस्य करार झाला आहे. ८०० कोटींहून अधिक गुंतवणूक प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पाचे आमदार महेश लांडगे यांनी स्वागत केले आहे. चिखलीतील हा प्रकल्प पिंपरी-चिंचवडच्या शैक्षणिक आणि औद्योगिक क्षमतेला नवी दिशा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
करारावर सीओईपीतर्फे कुलसचिव डॉ. डी. एन. सोनावणे आणि जेएसडब्ल्यू समूहातर्फे कार्यकारी उपाध्यक्ष नरेश ललवाणी यांनी स्वाक्षर्या केल्या.
प्रस्तावित केंद्रात लिथियम-आयन, सोडिअम-आयन आणि इतर प्रगत तंत्रज्ञानावर आधारित बॅटरी सेलचे संशोधन, प्रोटोटायपिंग व प्रमाणीकरण होणार आहे. केंद्र दोन टप्प्यांत विकसित करण्याचे नियोजन असून, त्यातून एक हजार रोजगारसंधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांना आणि युवा अभियंत्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानावर प्रत्यक्ष काम करण्याची संधीही उपलब्ध होऊ शकते. या भागीदारीबाबत जेएसडब्ल्यू समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांनी, सेल हे या शतकातील नवीन इंधन असून हे सेल भारतातच तयार करण्याची वेळ आली आहे, असे म्हटले आहे. सीओईपीसोबतची भागीदारी उद्योग, संशोधन आणि शिक्षण क्षेत्राला नवा आयाम देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पिंपरी-चिंचवडला ‘एज्युकेशन हब’ म्हणून विकसित करण्याचा संकल्प आपण केला असल्याचे आमदार लांडगे यांनी सांगितले. जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ तसेच सीओईपी आणि आयआयएम नागपूरच्या शैक्षणिक संधी शहरात उपलब्ध व्हाव्यात यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा त्यांनी उल्लेख केला. आता चिखलीतील बॅटरी संशोधन केंद्रामुळे या संकल्पात उद्योगाशी जोडलेल्या संशोधनाची भर पडणार असल्याचे त्यांनी नमूद केले. स्वदेशी बॅटरी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी झालेल्या भागीदारीबद्दल सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ आणि जेएसडब्ल्यू प्रोजेक्ट्सचे अभिनंदन केले. प्रस्तावित गुंतवणुकीतून दर्जेदार संशोधन, कौशल्यविकास आणि स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
Related
Articles
’गिफ्ट पार्सल’च्या नावाखाली सीबीआयची धमकी
05 Oct 2026
कुर्डुवाडीतील ’ट्रॉमा केअर’ तातडीने सुरू करा
07 Oct 2026
गरिबांच्या जेवणाची जबाबदारी केंद्रचालकांच्या खिशावर
09 Oct 2026
मुळा-मुठा प्रदूषणमुक्तीसाठी 1 हजार 438 कोटींचा आराखडा
07 Oct 2026
यूपीआयच्या अतिरिक्त शुल्काची उद्योगनगरीतील लघुउद्योगांना धास्ती
04 Oct 2026
भारत-वेस्ट इंडिज टी-20 मालिकेला आजपासून सुरुवात
06 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान