E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मनोरंजन
पर्यटनाच्या विकासासाठी चित्रपट उपयुक्त : ओम राऊत
Samruddhi Dhayagude
30 Sep 2026
पाचव्या आंतरराष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवाचा समारोप
पुणे : पर्यटन आणि लघुपट-चित्रपटनिर्मिती ही परस्परपूरक क्षेत्रे ठरू शकतात. त्यामध्ये युवा दिग्दर्शकांसाठी अनेक नव्या संधी आहेत. त्या संधींचा योग्यप्रकारे लाभ उठवायला हवा, असे मत प्रसिद्ध अभिनेते ओम राऊत यांनी व्यक्त केले. पर्यटन आणि चित्रपट, या दोन्ही ठिकाणी आपण एक गोष्ट सोबत घेऊन येतो, जी आपल्याला जागे करते, संवेदनशील बनवते, जाणिवा समृद्ध करते, असेही ते म्हणाले.
जागतिक पर्यटन दिनानिमित्त परभन्ना फाऊंडेशन, महाराष्ट्र पर्यटन विभाग, दादासाहेब फाळके चित्रनगरी आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने यशदामध्ये आयोजित पाचव्या आंतरराष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवाच्या पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी ओम राऊत यांना ’परभन्ना विशेष योगदान पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेते शशांक शेंडे आणि माजी सनदी अधिकारी शेखर गायकवाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. दीपक पुजारी यांना ’परभन्ना जीवनगौरव पुरस्कार’ देण्यात आला. उत्कृष्ट कृषी पर्यटन पुरस्कार मधुबन अॅग्रो टुरिझम चंद्रपूर यांना देण्यात आला.
यावेळी महोत्सवाचे प्रमुख संयोजक गणेश चप्पलवार, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, चित्रनगरीचे जनसंपर्क अधिकारी पंकज चव्हाण, परीक्षक वैशाली केंदळे आणि डॉ. अनमोल कोठडिया आदी उपस्थित होते. यंदाच्या महोत्सवात लघुपट, माहितीपट, व्हीलॉग आणि विद्यार्थी चित्रपट, अशा विभागांत पुरस्कार देण्यात आले. सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा प्रथम पुरस्कार ‘द रिकार्ड डान्स’ला, तर सर्वोत्कृष्ट लघुपट पुरस्कार ’केकी’ या लघुपटाला मिळाला. उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार माहितीपटासाठी नीलेश कुंजीर, तर लघुपटासाठी तुषार उडेग यांना मिळाला.
शशांक शेंडे, गणेश चप्पलवार, मेघराज राजेभोसले, पंकज चव्हाण, डॉ. अनमोल कोठडिया, वैशाली केंजळे यांनी मनोगत व्यक्त केले. आरजे तेजस्वी फुलसुंदर, प्रा. डॉ. सुनील धनगर यांनी सूत्रसंचालन केले. अमित त्रिभुवन यांनी आभार मानले.
Related
Articles
वाचक लिहितात
14 Oct 2026
भारत दौर्यासाठी झिम्बाब्वेचे नेतृत्व जोसेफिन नकोमोकडे
11 Oct 2026
उच्चशिक्षित हातांची कलात्मक जादू
08 Oct 2026
शेअर बाजाराची उसळी
09 Oct 2026
केतन हत्याकांड प्रकरणातील डिजिटल पुरावे एकत्र
08 Oct 2026
कोंडी दूर करा (अग्रलेख)
12 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात