E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
ग्रामीण विद्यार्थ्यांना होणार पाच परकीय भाषांची ओळख
Samruddhi Dhayagude
30 Sep 2026
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उपक्रम; २४० शिक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षण
पुणे : ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना परकीय भाषा आणि विविध देशांच्या संस्कृतीची प्राथमिक ओळख करून देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागाने पुढाकार घेतला आहे. पुणे जिल्हा परिषद आणि विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार्या या उपक्रमाच्या दुसर्या वर्षाला २१ सप्टेंबरपासून सुरुवात झाली असून, यंदा दोनवरून पाच परकीय भाषांमध्ये प्रशिक्षणाचा विस्तार करण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत पुणे जिल्हा परिषदेच्या २४० शिक्षकांना विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागामार्फत ऑनलाईन प्रशिक्षण दिले जात आहे. यामध्ये जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, रशियन आणि जपानी या पाच भाषांचा समावेश आहे. जर्मन भाषेसाठी १३२, फ्रेंचसाठी २८, स्पॅनिशसाठी २५, रशियनसाठी २५ आणि जपानीसाठी ३० शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.
शिक्षकांसाठी १८० तासांचा संरचित भाषा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. ऐकणे, वाचन, लेखन आणि बोलणे या चार मूलभूत भाषा-कौशल्यांवर अभ्यासक्रमात विशेष भर देण्यात आला आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शिक्षकांना संबंधित भाषेतील दैनंदिन संभाषण समजणे, साधे मजकूर वाचणे आणि छोटे निबंध लिहिणे यांसारखी प्राथमिक कौशल्ये आत्मसात करता येणार आहेत.
‘प्रशिक्षकांचे प्रशिक्षण’ या संकल्पनेवर हा उपक्रम आधारित आहे. विद्यापीठाकडून प्रशिक्षण घेतलेले शिक्षक पुढे आपल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना संबंधित परकीय भाषा आणि संस्कृतीची प्राथमिक माहिती देणार आहेत. पहिल्या वर्षी दोन भाषांसाठी १०२ शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले होते. या शिक्षकांनी प्रत्येकी सुमारे ५० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिल्याने सुमारे ५ हजार १०० विद्यार्थ्यांना त्याचा लाभ झाला.
यंदा पाच भाषांमध्ये २४० शिक्षकांना प्रशिक्षण दिले जात असल्याने ग्रामीण भागातील अधिक विद्यार्थ्यांपर्यंत परकीय भाषांचे ज्ञान पोहोचणार आहे. परकीय भाषांच्या अध्ययनामुळे विद्यार्थ्यांच्या भाषिक जाणिवा, संवादकौशल्य तसेच विविध संस्कृती समजून घेण्याच्या क्षमतेला चालना मिळणार आहे.
Related
Articles
भारतीय मसाल्यावरील आयात शुल्कात कपातीची अमेरिकन व्यापार्यांना आशा
08 Oct 2026
‘पे अँड पार्क’च्या नावाखाली नागरिकांना भुर्दंड
03 Oct 2026
एमआयटी परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार
06 Oct 2026
शहरातील 501 आस्थापनांना अग्निसुरक्षेच्या नोटिसा
07 Oct 2026
राज्यात १६ ऑक्टोबरपासून दहा टक्के पाणी कपात !
06 Oct 2026
जादूगुडातील किरणोत्सर्गाच्या आरोपांचे प्रमुखाकडून खंडन
07 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान