E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
महापालिकेतील भरती गैरव्यवहार राजेंद्र खेडेकरला अटक
Samruddhi Dhayagude
30 Sep 2026
पुणे : महापालिकेत विविध पदांवर नोकरीचे आमिष दाखवून अनेकांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी जेजुरी येथील मार्तंड देवस्थानचा विश्वस्त राजेंद्र खेडेकरला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. भरती गैरव्यवहार प्रकरणात सहभागी आरोपींनी चौदाहून अधिक उमेदवारांना बनावट नियुक्तीपत्रे देऊन त्यांची पावणेतीन कोटींहून अधिक फसवणूक केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
या गुन्ह्यात खेडेकर याच्यासह महापालिकेच्या शिक्षण विभागातील शिपाई शिवानंद बाळासाहेब पाटील आणि अन्य आरोपींविरोधात शिवाजीनगर आणि भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत, महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अधीक्षकांनी तक्रार दिली.हा प्रकार मे २०२२ ते मे २०२५ या कालावधीत महापालिकेच्या परिसरासह इतर ठिकाणी घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आरोपींनी बेरोजगारांना पालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. आरोपींनी आपसांत संगनमत करून महापालिकेचे बनावट लेटरहेड, शिक्के आणि वरिष्ठ अधिकार्यांच्या खोट्या स्वाक्षर्यांचा वापर करून बोगस नियुक्तीपत्रे तयार केली.
उमेदवारांना त्यांनी बनावट नियुक्तीपत्रे, ओळखपत्रे, सेवा पुस्तिका, वैद्यकीय प्रमाणपत्रे आणि पगाराच्या पावत्याही दिल्या; इतकेच नव्हे तर उमेदवारांचा विश्वास बसावा यासाठी त्यांच्या बँक खात्यात पगार जमा झाल्याचे दाखविले, असे तक्रारींमध्ये नमूद आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर खेडेकर पसार झाला होता. त्याने अटकपूर्व जामिनासाठी पुणे सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळला होता.
तीन ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी
नोकर भरतीचा सुनियोजित घोटाळा हा मोठ्या संघटित कटाचा भाग असून, त्यामुळे सरकारी भरती प्रक्रियेवरचा सर्वसामान्यांचा विश्वास डळमळीत झाला आहे; तसेच अनेक बेरोजगार व्यक्तींचे आर्थिक नुकसान झाले आहे. आरोपांचे स्वरूप व गांभीर्य, आरोपींचा प्राथमिक सहभाग व भूमिका, तपासाची सद्यःस्थिती आणि व्याप्ती व आरोपीच्या पोलिस कोठडीतील चौकशीची आवश्यकता लक्षात घेता आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर करता येणार नाही, असे न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हटले होते.
गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी न्यायालयाने खेडेकरला तीन ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याच्या तपासाची व्याप्ती लक्षात घेत न्यायालयाने आरोपीला पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीश दिघावकर यांनी दिली.
Related
Articles
सलग दुसर्या दिवशी काँग्रेस आक्रमक
08 Oct 2026
वासोटा किल्ला गुरुवारपासून पर्यटनासाठी खुला
11 Oct 2026
तुळजाभवानी देवीच्या नवरात्र महोत्सवास आजपासून प्रारंभ
11 Oct 2026
‘आप’चे उद्या आंदोलन
14 Oct 2026
काळेवाडीत खासगी शाळेच्या बसचा अपघात
13 Oct 2026
भिमानगरमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार !
13 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात