श्रीमंत थोरले बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन   

पुणे : श्री देवदेवेश्वर संस्थान पर्वती व कोथरूड यांच्या वतीने अजिंक्य योद्धा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या ३२६ व्या जयंतीनिमित्त पर्वतीवरील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
 
महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त असलेल्या अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी आणि प्रमुख विश्वस्त सुधीर पंडित यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विश्वस्त रमेश भागवत, पुष्करसिंह पेशवा, जगन्नाथ लडकत उपस्थित होते.
 
विजय जोशी म्हणाले, महाराष्ट्र सरकारच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या अमृत या संस्थेमार्फत श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करण्यात येत आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यांत थोरले बाजीराव पोहोचले, याचा आनंद आहे. लोकांना बाजीराव कोण होते, याची माहिती व्हावी आणि त्यांचे कर्तृत्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे, यासाठी यापुढेही कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी जगन्नाथ लडकत रमेश भागवत, सुधीर पंडित यांनी मनोगत व्यक्त केले. पुष्करसिंह पेशवा यांनी आभार मानले.
 

Related Articles