एचएमटीआरच्या निविदेचा मुहूर्त नोव्हेंबरमध्ये!   

प्रकल्पाची निविदा काढण्यासाठी महापालिकेची तयारी पूर्ण; आयुक्त नवलकिशोर राम यांची माहिती

पुणे: शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एचसीएमटीआर प्रकल्पाची निविदा येत्या नोव्हेंबर महिन्यात काढण्यात येणार असून कामाला सुरुवात होईल अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे. यानुसार शहरामध्ये एचएमटीआर आणि रिंग रोडच्या कामासाठी उच्च स्तरीय समिती नेमण्यात आली आहे.
 
शहरातील वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या आणि प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेता, सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. या पार्श्वभूमीवर एचएमटीआर प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. शहरातील विविध भागांना जोडणार्‍या या प्रकल्पामुळे भविष्यातील वाहतूक    व्यवस्थेला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.एचएमटीआर प्रकल्पाच्या निविदेसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक आणि प्रशासकीय बाबींची पूर्तता करण्याचे काम महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे आणि इतर तयारी पूर्ण झाली असून, आता नोव्हेंबरमध्ये निविदा प्रसिद्ध करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
 
महापालिका प्रशासनाने शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विविध पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यामध्ये एचएमटीआर प्रकल्पाला महत्त्वाचे स्थान आहे. प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील टप्प्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
 
दरम्यान, महापालिकेच्या विविध महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देण्यावर प्रशासनाचा भर आहे. वाहतूक, पाणीपुरवठा, मलनिस्सारण आणि रस्ते अशा मूलभूत सुविधांशी संबंधित प्रकल्प वेळेत मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून एचएमटीआरची निविदा प्रक्रिया नोव्हेंबरमध्ये सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
 
एचएमटीआर प्रकल्पाच्या निविदेसाठी आवश्यक असलेली सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात प्रकल्पाची निविदा काढण्यात येईल, असे आयुक्त नवलकिशोर राम यांनी स्पष्ट केले.

वाहतूक कोंडीवर उतारा?

शहराचा विस्तार वेगाने होत असताना प्रमुख मार्गांवरील वाहतूक वाढत आहे. त्यामुळे केवळ रस्ते रुंदीकरणावर भर न देता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. एचएमटीआर प्रकल्पाची अंमलबजावणी झाल्यानंतर शहरातील वाहतुकीच्या नियोजनाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आता नोव्हेंबरमध्ये निघणार्‍या निविदेकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
 

Related Articles