E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
’बँक ऑफ इंडिया’च्या इमारतीला आग
Samruddhi Dhayagude
30 Sep 2026
लक्ष्मी रस्त्यावरील घटना; महत्त्वाची कागदपत्रे, संगणक जळाले
पुणे : लक्ष्मी रस्त्यावरील उंबर्या गणपती चौकातील (शगुन चौक) ‘बँक ऑफ इंडिया’च्या इमारतीतील सहाव्या मजल्यावर मंगळवारी सकाळी अचानक आग लागली. या दुर्घटनेत महत्त्वाची कागदपत्रे, संगणक यंत्रणा जळाली. दरम्यान, पहिल्या मजल्यावरील बँकेच्या कार्यालयास आगीची झळ पोचलेली नाही. सर्व रोकड सुरक्षित असून, बँकिंग व्यवहार नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू असल्याचे बँकेच्या वरिष्ठ अधिकार्याने स्पष्ट केले.
अग्निशामक दलाच्या नियंत्रण कक्षाला सकाळी सव्वादहाच्या सुमारास आगीची माहिती मिळाली. त्यानंतर मध्यवर्ती, कसबा, एरंडवणा, नायडू आणि कोंढवा केंद्रांतून चार बंब आणि तीन पाण्याचे टँकर अशी सात वाहने रवाना करण्यात आली. इमारतीच्या सहाव्या मजल्यावर कार्यालयातील वातानुकूलन यंत्रणेने पेट घेतला. सुरक्षा रक्षकाने अग्निरोधक उपकरणाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला; मात्र आगीने रौद्ररूप धारण केले. जवानांनी होज पाइप, ‘बीए सेट’ आणि एक्झॉस्ट ब्लोअरच्या साहाय्याने आगीवर तासाभरात नियंत्रण मिळवले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.
मुख्य अग्निशमन अधिकारी गणेश सोनुने यांच्या नेतृत्वाखाली केंद्रप्रमुख पंकज जगताप, कमलेश चौधरी, नीलेश महाजन तसेच जवान आझीम शेख, दिलीप घडशी, चंद्रकांत आनंदास, संतोष अरगडे, कैलास पवार, विशाल गायकवाड, चंद्रकांत नवले, सुरेश पवार यांच्यासह ३० जवानांनी या कारवाईत सहभाग घेतला. दरम्यान, घटनास्थळी फायर एक्स्टिंगविशर, फायर अलार्म आणि डिटेक्शन सिस्टीम होती. परंतु स्थायी अग्निशामक यंत्रणा अस्तित्वात नसल्याचे पाहणीत समोर आल्याचे अग्निशामक दलाकडून सांगण्यात आले.
’फायर ऑडिट’ न केल्यास कारवाई : आयुक्त
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शहरातील सर्व आस्थापनांना नियमित फायर ऑडिट करण्याबाबत आणि नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गेल्या आठवडाभरात ४१४ हॉटेल्स, कोचिंग क्लासेस, पेईंग गेस्ट आणि रुग्णालयांची तपासणी करून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
Related
Articles
कोणत्याही अब्जाधीशाला भारताचे धोरण ठरवता येत नाही
11 Oct 2026
नुकसानीचे सरसकट पंचनामे करून मदत द्या
08 Oct 2026
पाकिस्तान लष्कराचे विमान कोसळून वैमानिकांचा मृत्यू
13 Oct 2026
भारतीय ऑलिम्पिक संघाच्या निवडणुका 5 डिसेंबरला
11 Oct 2026
असंघटित कामगारांसाठी ‘ई-श्रम’ पोर्टल
13 Oct 2026
जिबूतीजवळ बोट उलटून १०९ जणांचा मृत्यू
12 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात