दिवे घाटात आज दोन तास वाहतूक बंद   

पुणे : आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गांअंतर्गत हडपसर ते दिवेघाटदरम्यान सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी आज (बुधवार) सुरक्षेच्या दृष्टीने दिवेघाट रस्त्यावरील वाहतूक दोन तास बंद ठेवण्यात येणार आहे. रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी दुपारी १२ ते २ या वेळेत ब्लास्टिंगचे काम करण्यात येणार आहे. या कामामुळे वाहतुकीवर परिणाम होणार असल्याने वाहनचालकांनी या मार्गावरून प्रवास करणे टाळावे, तसेच प्रवासासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि शहर वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. या कालावधीत नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाला सहकार्य करावे आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.

Related Articles