E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
खासदार उदयनराजे यांच्या हस्ते होणार पुणे बुक फेअरचे उद्घाटन
Samruddhi Dhayagude
30 Sep 2026
पुणे : २४ व्या पुणे बुक फेअरला ७ ऑक्टोबरपासून टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर सुरुवात होत असून खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे. संयोजक पी.एन.आर. राजन, लोकमंगल समूह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व पुणे बुक फेअरचे समन्वयक शिरीष चिटणीस आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रसाद मिरासदार यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
पुणे बुक फेअर ११ ऑक्टोबरपर्यंत चालणार असून सकाळी ११ ते रात्री ८ अशी वेळ आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद रावत उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी असून संस्थेचे उपाध्यक्ष अशोक पलांडे, शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह, साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, रवींद्र गुर्जर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
‘कोर्या कागदा पल्याड’ कवितांचा कार्यक्रम ‘चला कुटुंब संस्था जपूया’ या विषयावरील डॉ. शाम बडवे यांचे व्याख्यान, नृत्यसंवाद, हास्य मैफल, उद्योजक पराग काटदरे यांची मुलाखत असे भरगच्च साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रम पुणे बुक फेअरमध्ये होतील.
‘चित्रपट विषयक साहित्य टिकावू आहे का?’ या विषयावरील परिसंवादात कृपाशंकर शर्मा, प्रभाकर खोले, ‘केसरी’चे वृत्तसंपादक स्वप्निल पोरे, श्रीपाद ब्रह्मेे, मुकुंद फडके, प्रा. धनंजय कुलकर्णी सहभागी होणार असून विरेंद्र चित्राव प्रमुख पाहुणे आहेत. ‘लेखक भेट’ कार्यक्रमात डॉ. सविता मोहिते, डॉ. अनुराग लव्हेकर, डॉ. नीलिमा गुंडी, डॉ. प्रेरणा उबाळे, श्रीराम नानल व इतरांचा सहभाग असून ‘केसरी’चे सहसंपादक रामदास नेहूलकर प्रमुख पाहुणे आहेत. कादंबरीकार राजेंद्र खेर यांची मुलाखत योगेश्वर गंधे घेणार आहेत. बबन पोतदार व डॉ. मंगेश कश्यप यांचे कथाकथन होईल.
विविध विषयांवरील मराठी, हिंदी, इंग्रजी, बंगाली, उर्दू, संस्कृत यांसह अन्यच भाषांमधील हजारो पुस्तके पुणे बुक फेअरमध्ये उपलब्ध होणार आहेत.
Related
Articles
विद्युत तार तुटल्याने आग; तीन एकर ऊस जळून खाक
14 Oct 2026
लढा सुरूच राहील : राहुल
14 Oct 2026
नोबेल न मिळाल्याने ट्रम्प यांचा थयथयाट नॉर्वेला धमकावले
11 Oct 2026
दुष्काळग्रस्त भागातील पात्र लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य
09 Oct 2026
युक्रेनचा अध्यक्ष बदलण्याची गरज : ट्रम्प
12 Oct 2026
आठवडाभरात मिरच्यांच्या दरात 20 रुपये वाढ
08 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात