E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
व्यासपीठ
वाचक लिहितात
Samruddhi Dhayagude
30 Sep 2026
अनधिकृत फलक हटवा
अनधिकृत बॅनरबाजीविरोधात नागरिकांमध्ये निर्माण झालेली जागरूकता स्वागतार्ह आहे. शहराचे विद्रुपीकरण करणार्या अनधिकृत बॅनर आणि जाहिरातींविरोधातही जनतेने आवाज उठवणे गरजेचे आहे. स्वच्छ, सुंदर आणि शिस्तबद्ध शहर ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. धार्मिक उत्सव, राजकीय कार्यक्रम, वाढदिवस, शुभेच्छा आणि विविध समारंभांच्या निमित्ताने चौकाचौकांत मोठमोठे बॅनर लावले जातात. या बॅनरमुळे रस्ते, पदपथ आणि वाहतुकीच्या मार्गात अडथळे निर्माण होतात. वादळी वार्यात किंवा पावसात कमकुवतपणे लावलेले फलक धोकादायक ठरू शकतात. महत्त्वाचे म्हणजे नियम सर्वांसाठी समान असायला हवेत. परवानगीशिवाय बॅनर लावणार्यांवर कारवाई होत असेल, तर त्यात राजकीय पक्ष, सामाजिक संस्था किंवा अन्य कोणालाही अपवाद असता कामा नये.
श्याम ठाणेदार, दौंड जिल्हा पुणे
रुग्णालयांकडून पिळवणूक
जीवनरक्षक आणि जीवनवर्धक औषधांच्या किमतींवर सरकारचे काही अंशी नियंत्रण असले तरी जीवनावश्यक वैद्यकीय उपकरणांना या नियंत्रणाबाहेर ठेवल्यामुळे खासगी रुग्णालयांचे आणि कंपन्यांचे फावले आहे. कायद्यातील त्रुटींचा आणि पळवाटांचा आधार घेत या खासगी रुग्णालये आणि कंपन्या ज्यादा दराने औषधे विकत आहेत. व्यापारात वाजवी नफा मिळवणे समजण्यासारखे आहे, परंतु जेव्हा नफ्याचे प्रमाण २८४१ टक्क्यांवर जाते, तेव्हा त्याला अवाजवी नफेखोरी म्हणतात. खरे तर दरोडेखोरी म्हणणे अधिक सयुक्तिक ठरेल. आधीच मानसिक दबावाखाली असलेले रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक रुग्णालयाकडून मिळणार्या वैद्यकीय साहित्याच्या किमती तपासण्याच्या मनःस्थितीत नसतात. त्यामुळे आजारी असलेल्या आपल्या माणसाला वाचवण्यासाठी नातेवाईक कोणतीही किंमत मोजायला तयार असतात. रुग्णाच्या याच अगतिकतेचा गैरफायदा खासगी रुग्णालयांकडून घेतला जातो.
प्रदीप मोरे, अंधेरी (पूर्व), मुंबई
परखड अग्रलेख
’अस्वस्थतता कुठे नेणार?’ हा परखड अग्रलेख पाकिस्तानच्या सद्य:स्थितीवर योग्य भाष्य करणारा आहे. सध्या पाकिस्तानची स्थिती ही ’हाती नाही होना, नी बाजीराव म्हणा’ सारखी आहे. अंतर्गत कलहाने तसेच आर्थिक दुरवस्थेमुळे, वाढत्या महागाईमुळे तिथली जनता त्रस्त आहे. सतत भारताचा दुस्वास करणे तिथल्या लोकांना आवडत नाही कारण स्वातंत्र्यानंतर भारत प्रगतीची व विकासाची शिखरे आखत आहे; पण द्वेषमूलक विचारसरणीमुळे पाकिस्तान गर्तेत खोल जात आहे. एकूणच पाकिस्तानकडे अमेरिका, चीनशी लाचारयुक्त संबंध बाळगण्याशिवाय पर्याय नाही. खरं तर पाकिस्तानमुळे धर्म व द्वेषमूलक राजकारणाने काय होते हा धडा जगाला दिला आहे.
माया भाटकर, पुणे
दुर्गम भागाला सुविधा द्या
गाव तिथे ’एसटी’ अशी, बिरुदावली मिरवणार्या राज्य मार्ग परिवहन मंडळाने, डोंगराळ व दुर्गम भागासाठी १०० मिडी बस खरेदी केल्या आहेत. डोंगराळ व दुर्गम भागात सुविधा उपलब्ध नसल्यामुळे, तेथील लोकांना एखाद्या कामासाठी मैल मैल पायपीट करावी लागते. परंतु तिथे पक्के रस्ते नसतील तर, डोंगराळ व दुर्गम भागातून त्या बसेस धावू शकतील ? डोंगराळ व दुर्गम भागातील लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नदीवर पूल नसल्यामुळे, शालेय विद्यार्थ्यांना अनेक मैल पायपीट करत किंवा नदी पार करून, शाळेत जावे लागते. अनेक गैरसोयी सहन करत तेथील लोक संघर्षाचे जीवन जगत आहेत. तेव्हा शासनाने सर्वप्रथम त्या भागात चांगले पक्के रस्ते बांधावेत. नद्यांवर पूल बांधावेत. त्या भागात वस्तीजवळ एखादे सुसज्ज रुग्णालय उभारावे.
गुरुनाथ मराठे, बोरिवली. (पूर्व)
ट्रम्प यांची मनमानी
ट्रम्प अमेरिकेचे पुन्हा अध्यक्ष झाल्यापासून आजपर्यंत सतत काही ना काही तरी विचित्र कारभार करत असतात. मनमानी कारभार करून विचित्र पद्धतीने निर्णय घेत असतात. आता त्यांनी रशिया आणि इराणवर देशांवर दबाव वाढवण्यासाठी रशियाकडून जे देश इंधन खरेदी करतील त्यांच्यावर शंभर टक्के शुल्क लावण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. ते जे निर्णय घेतील तो अंतिम असेल अशा प्रकारे त्यांचा कारभार चालू आहे; परंतु ट्रम्प यांना त्यांच्या स्वतःच्या देशातील लोकांनीच विरोध करून आंदोलन केले आहे. जगातील प्रत्येक राष्ट्र हे स्वतंत्र आहे. त्यांनी कोणत्या देशाकडून इंधन खरेदी करायचे अथवा देश कसा चालवायचा त्याचे पूर्ण स्वातंत्र्य हे प्रत्येक राष्ट्राला आहे याचे भान ट्रम्प यांना राहिलेले नाहीये. भविष्यात याचा फटका ट्रंप यांच्यामुळे अमेरिकेला भोगावा लागू शकतो.
विजय आकुर्डेकर, पुणे
Related
Articles
राज्यातून मान्सूनची लवकरच माघार
04 Oct 2026
एकमताने किंवा बहुमताने न घेतलेले निर्णय रद्द करण्याचे संकेत
06 Oct 2026
दक्षता समितीच्या सदस्यांच्या नावाचे फलक पोलिस ठाण्यात लावा
06 Oct 2026
वैमानिक स्मित मच्छार जागतिक नायक : नेतन्याहू
05 Oct 2026
वाचक लिहितात
08 Oct 2026
आंदोलन सोडा ; अभ्यासाकडे वळा
08 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान