इराणच्या चलनाची घसरगुंडी   

एका डॉलरसाठी २० लाख ५० हजार रियाल

तेहरान : इराणचे चलन मंगळवारी विक्रमी घसरले आहे. एका डॉलरसाठी २० लाख ५० हजार रियाल मोजावे लागत आहेत. २७ दिवसांपूर्वी डॉलरच्या तुलनेत रियाल घसरले होते.  २ सप्टेंबर रोजी एका डॉलरसाठी २० लाख २० हजार रियाल मोजावे लागत होते.  त्यानंतरची ही सर्वात मोठी घसरण आहे. 
 
अमेरिका आणि इस्रायल यांनी फेब्रुवारीत इराणवर जोरदार हल्ले चढवले होते. युद्धाचा भडका उडाल्यानंतर रियालची घसरगुंडी सुरूच राहिली. अमेरिकेचे आर्थिक निर्बंध, खनिज तेल आणि वायूच्या व्यापाराची कोंडी, बंदरे, नौदल आणि होर्मुझ सामुद्रधुनीवरील खडा पहारा यामुळे इराणची अर्थव्यवस्था अगोदरच खिळखिळी झाली आहे. त्याचे दूरगामी परिणाम अर्थव्यवस्थेवर होण्याबरोबरच चलन रियालवर देखील झाले आहेत.   
 

Related Articles