E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शेवगाव तालुक्यात ५४ वर्षांतील बारावा दुष्काळ
Samruddhi Dhayagude
29 Sep 2026
शेवगाव (वार्ताहर) : यंदाच्या मान्सूनमध्ये पावसाचे बहुतांश दिवस कोरडे गेल्याने तालुक्यात सरासरीच्या तुलनेत तब्बल ५४% पावसाची तूट निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून, राज्य शासनाने २६ सप्टेंबर रोजी तालुका अधिकृतपणे दुष्काळग्रस्त जाहीर केला आहे. १९७२च्या महादुष्काळानंतर २०२६ मधील दुष्काळ हा ५४ वर्षांतील बारावा दुष्काळ ठरला आहे.
तालुक्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५५० मिलिमीटर असून, यंदा आतापर्यंत केवळ २१० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाअभावी खरिपाबरोबरच रब्बी हंगामही धोक्यात आला आहे. भूजलपातळी खालावल्याने पिण्याचे पाणी व जनावरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
सध्या तालुक्यातील २१ गावे व ११७ वाड्या-वस्त्यांना १७ टँकरद्वारे ३८ खेपांमधून पाणीपुरवठा सुरू असून, २८ हजार ७४९ नागरिक टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. सात गावांचे टँकर प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांत दोन गावे व ११ वाड्या-वस्त्यांसाठी दोन टँकर नव्याने सुरू करण्यात आले आहेत.
दरम्यान, १९७२ मध्ये धान्यवाटप व रोजगार हमीवर भर होता; यंदा मोफत धान्य, रोजगार आणि डीबीटीद्वारे मदत देण्यात येणार आहे. जिल्हा व तालुका पातळीवर दुष्काळ नियंत्रण कक्ष कार्यरत करण्यात येणार असून, धरणे व बंधार्यांतील पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याचे नियोजन आहे. टँकर व्यवस्थापन, चारा उपलब्धता आणि पुढील आठ महिन्यांसाठी पाणी सुरक्षित ठेवणे प्रशासनापुढील प्रमुख आव्हान ठरणार आहे. ग्रामीण भागातील विहिरी कोरड्या पडण्याची शक्यता असल्याने प्रशासनाला आतापासूनच उपाययोजना कराव्या लागणार आहेत.
Related
Articles
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ
12 Oct 2026
सुग्रीवाचे कुंभकर्णाला युद्धाचे आव्हान
12 Oct 2026
भुवनेश्वर कुमारचे चार वर्षांनंतर पुनरागमन
08 Oct 2026
लढा सुरूच राहील : राहुल
14 Oct 2026
किल्ला चढताना पर्यटकाचा मृत्यू
12 Oct 2026
दुष्काळामुळे शिरूरमध्ये बैलपोळा साधेपणाने
11 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात