E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
सह्याद्रीच्या कुशीत रंगला रानफुलांचा पुष्पोत्सव
Samruddhi Dhayagude
29 Sep 2026
अकोले (वार्ताहर) : तालुक्यातील सह्याद्री डोंगररांग सध्या रंगीबेरंगी रानफुलांनी बहरली असून, सर्वत्र जणू फुलांचा गालीचा पसरल्याचे मनोहारी दृश्य पहायला मिळत आहे. पूर्व पावसाळ्यात काजव्यांचा काजवोत्सव, पावसाळ्यात धबधब्यांचा जलोत्सव आणि पावसाळ्यानंतर आता पुष्पोत्सवाने सह्याद्रीचे सौंदर्य खुलले आहे. फोफसंडी, हरिश्चंद्रगड, भंडारदरा, विश्रामगड तसेच कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसरात सप्टेंबरपासून सुरू झालेला हा फुलोत्सव आता पूर्ण बहरात आला आहे.
दर्या-खोर्या, रानवाटा, डोंगरमाथे आणि कड्याकपारी हिरवाईने नटल्या असून, त्यावर विविध रंगांची फुले उमलली आहेत. तेरडा अर्थात गुलमेंहदी, हळदी-कुंकू, कारवी, घाणेरी आणि अग्निशिखा ही फुले पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरत आहेत. तेरड्याच्या लाल, गुलाबी व पांढर्या गुच्छांनी रतनवाडी, घाटघर आणि भंडारदरा परिसर खुलला आहे. कारवीचे जांभळे सौंदर्य सह्याद्रीचे वैशिष्ट्य मानले जाते तर अग्निशिखा हे दुर्मिळ, औषधी तसेच विषारी फूल आहे.
याशिवाय सोनकी, निसुर्डी, रानहळद, सीतेची आसवे, रानतूर, श्वेतांबर, सोनसरी, कुसुंबी, लाजाळू आदी असंख्य रानफुलांनी परिसर सजला आहे. फुलांवर मधमाशा, भुंगे आणि रंगीबेरंगी फुलपाखरांची गर्दी वाढली आहे. हा निसर्गोत्सव पाहण्यासाठी पर्यटक व वनस्पतीशास्त्राचे विद्यार्थी मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.पर्यटकांनी फुले तोडू नयेत, त्यांना पायदळी तुडवू नये तसेच प्लॅस्टिक व कचरा टाकून निसर्गाची हानी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
Related
Articles
दहशतवादी युनूस येथे कसा?
14 Oct 2026
दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त
14 Oct 2026
जॉर्जियाच्या दंतचिकित्सकामुळे वैमानिक मच्छार यांना जीवदान
08 Oct 2026
टँकरच्या घोटभर पाण्यावर आष्टीकरांची तहान; १३ गावांचे प्रस्ताव प्रतीक्षेत
13 Oct 2026
हा मूर्खपणा थांबवा...
13 Oct 2026
वासोटा किल्ला गुरुवारपासून पर्यटनासाठी खुला
11 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात