E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
बिनविरोधची जबाबदारी राजन पाटील यांच्यावर?
Samruddhi Dhayagude
29 Sep 2026
सोलापूर डीसीसी बँक निवडणूक
सोलापूर, (प्रतिनिधी) : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाच जिल्ह्याच्या सहकार राजकारणात पडद्यामागील हालचालींना वेग आला आहे. जवळपास दहा वर्षांच्या प्रशासकीय कालावधीनंतर होणार्या या निवडणुकीकडे केवळ बँकेची निवडणूक म्हणून न पाहता जिल्ह्यातील सहकार आणि राजकारणाच्या नव्या समीकरणांची चाचणी म्हणून पाहिले जात आहे. एकीकडे मोहिते-पाटील गटाकडून सहकारातील जुन्या संबंधांच्या आधारे मोर्चेबांधणी सुरू असल्याचे चित्र आहे, तर दुसरीकडे भाजपकडून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी समन्वयाचा मार्ग स्वीकारण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.
या पार्श्वभूमीवर माजी आमदार राजन पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या भूमिकेनुसार जिल्हा बँकेची निवडणूक सर्वपक्षीय समन्वयातून बिनविरोध व्हावी, यासाठी राजन पाटील यांच्यावर समन्वयाची जबाबदारी सोपविल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. विशेष म्हणजे राजन पाटील यांनी अलीकडेच दुष्काळी परिस्थितीचा विचार करून जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेला आता अधिक राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
अनगर येथील राजन पाटील यांचे ’मातोश्री’ निवासस्थान यापूर्वीही जिल्ह्यातील विविध राजकीय घडामोडींचे केंद्र राहिले आहे. जिल्ह्यातील अनेक राजकीय कुटुंबांशी राजकारणापलीकडचे संबंध ही राजन पाटील यांची जमेची बाजू मानली जाते. त्यामुळे विविध गटांमध्ये संवाद साधून तोडगा काढण्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आल्याची चर्चा आता महत्त्वाची ठरत आहे. गेल्या काही दिवसांत डीसीसी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. आमदार राजेंद्र राऊत यांच्यासह काही आमदार, माजी आमदार आणि माजी संचालकांच्या भेटीगाठी झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नांसोबतच संभाव्य निवडणुकीची तयारीही समांतरपणे सुरू असल्याचे चित्र आहे.
मोहिते-पाटील गटाच्या हालचालींनी वाढवली उत्सुकता
खासदार धैर्यशील मोहिते-पाटील आणि माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या सहकार क्षेत्रातील सक्रियतेमुळे डीसीसी बँकेची निवडणूक अधिक चर्चेत आली आहे. विशेषतः सहकारातील जुन्या संपर्कांचा वापर करून मोर्चेबांधणी करण्याच्या हालचाली सुरू असल्याने बिनविरोधाच्या प्रयत्नांसमोर आव्हान उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा बँक भाजप स्वबळावर लढविण्याबाबत भूमिका मांडली होती. त्याच काळात राजन पाटील यांनी बिनविरोध निवडणुकीचे आवाहन केल्याने जिल्हा बँकेच्या राजकारणात दोन समांतर शक्यता दिसत आहेत-एकीकडे राजकीय ताकदीची चाचणी आणि दुसरीकडे समन्वयातून निवडणूक टाळण्याचा प्रयत्न.
दहा वर्षांच्या संचालकांना पुन्हा संधी की नव्या चेहर्यांना प्रवेश?
डीसीसी बँकेच्या निवडणुकीत सर्वाधिक उत्सुकता आहे, ती संचालकांच्या नव्या रचनेबाबत. प्रशासकीय कालावधी आणि बदललेल्या नियमांमुळे जुन्या संचालक मंडळातील अनेकांना पुन्हा संधी मिळणार की नव्या चेहर्यांना संधी दिली जाणार, हा प्रश्न महत्त्वाचा आहे.याच कारणामुळे जिल्ह्यातील अनेक नेते आपल्या राजकीय वारसदारांना सहकाराच्या राजकारणात पुढे आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. बिनविरोध निवडणूक झाल्यास प्रत्येक मतदारसंघात उमेदवारीची जुळवाजुळव करणे हीच खरी कसोटी ठरणार आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली तरी राजकीय वाटाघाटींचा रंग मात्र तितकाच गडद राहण्याची शक्यता आहे.
अंतिम शब्द ’अनगर’मधून निघणार?
डीसीसी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी खरोखरच राजन पाटील यांच्यावर समन्वयाची मोठी जबाबदारी आली असेल, तर आगामी काळात अनगर येथील ’मातोश्री’ निवासस्थान पुन्हा एकदा जिल्ह्याच्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी येऊ शकते. राजन पाटील यांच्यासमोर एका बाजूला भाजपची अपेक्षा, दुसर्या बाजूला मोहिते-पाटील गटाच्या हालचाली, तर तिसर्या बाजूला जिल्ह्यातील विविध राजकीय कुटुंबांच्या संचालकपदाच्या अपेक्षा असतील.
या सर्वांना एकाच सूत्रात बांधून डीसीसी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल.म्हणूनच आता सोलापूरच्या सहकार राजकारणात एकच प्रश्न चर्चेत आहे-डीसीसी बँकेची निवडणूक खरोखरच बिनविरोध होणार की सहकाराच्या मैदानात पुन्हा एकदा राजकीय सामना रंगणार? आणि बिनविरोधाचा मार्ग काढण्याची धुरा खरोखरच अनगरकरांच्या खांद्यावर येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Related
Articles
दोन कोटींचे दागिने लुटणार्या टोळीला अटक
11 Oct 2026
दिल्ली पोलिसांवर खटला का चालवू नये?
12 Oct 2026
विठ्ठल मंदिर समितीकडून दुष्काळाग्रस्तांसाठी मदतीचा हात
09 Oct 2026
श्रेयसची टी-20 क्रमवारीत सातव्या स्थानावर झेप
08 Oct 2026
महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ३७ लाखांहून अधिक अर्ज
08 Oct 2026
नरसिंग गिरजी गिरणीची दगडी भिंत केली जमीनदोस्त
08 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात