E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
कोर्टीत एक एकर ऊस जळाला
Samruddhi Dhayagude
29 Sep 2026
पंढरपूर, (वार्ताहर) : पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथे शॉर्टसर्किटमुळे शेतातील तब्बल एक एकर ऊस जळून पूर्णपणे खाक झाल्याची घटना घडली आहे. येथील शेतकरी नबीलाल हुसेन नदाफ यांच्या शेतातील ऊसाला अचानक आग लागल्याने काही वेळातच संपूर्ण ऊस जळून गेला. या घटनेत नदाफ यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
कोर्टी परिसरातील शेतात नबीलाल नदाफ यांनी एक एकर क्षेत्रावर ऊसाची लागवड केली होती. ऊसाची वाढ चांगली झाल्याने यंदाच्या गळीत हंगामात या क्षेत्रातून ७० टन एकरी उत्पादनाची अपेक्षा होती. मात्र, शेतातून गेलेल्या वीजवाहिनीतील शॉर्टसर्किटमुळे अचानक ठिणगी पडून ऊसाला आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.
आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. ऊसाचे पीक पूर्णपणे उभे जळून खाक झाल्याने शेतकर्याच्या वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले. ऊस जळाल्याने अपेक्षित उत्पादन तर हातचे गेलेच, शिवाय लागवडीसाठी झालेला खर्चही वाया गेला आहे.ऊस जळाल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिक व शेतकर्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत मोठ्या प्रमाणात ऊस जळून गेला होता.
वीजवाहिन्या, खांब व विद्युत उपकरणांमध्ये बिघाड होऊन शेतातील पिकांना आग लागण्याच्या घटना अधूनमधून घडत आहेत. त्यामुळे महावितरणने ग्रामीण भागातील वीजवाहिन्या व विद्युत यंत्रणेची पाहणी करून धोकादायक ठिकाणांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकर्यांकडून होत आहे.शॉर्टसर्किटमुळे ऊस जळून झालेल्या नुकसानीची संबंधित विभागाने पाहणी करून पंचनामा करावा आणि नदाफ यांना शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
Related
Articles
भारताच्या ‘बिग कॅट अलायन्स’मध्ये घाना
09 Oct 2026
गरज की स्वार्थ? (अग्रलेख)
14 Oct 2026
मयांकला गोलंदाजी न देण्याचा निर्णय चुकीचा : गावस्कर
11 Oct 2026
हॉलीवूड अभिनेते मिट्टे यांचे निधन
14 Oct 2026
किल्ला चढताना पर्यटकाचा मृत्यू
12 Oct 2026
मुख्य निवडणूक अधिकार्यांच्या कार्यालयाबाहेर ‘आप’चे आंदोलन
08 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात