E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महापालिका क्षेत्रात १ लाख ४१ हजार २४६ गणेशमूर्तींचे संकलन
Samruddhi Dhayagude
29 Sep 2026
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला नागरिकांचा प्रतिसाद
पिंपरी : पिंपरी महापालिकेच्या वतीने गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन, निर्माल्य संकलन, कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती तसेच शाडू मातीच्या पुनर्वापराला प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांना नागरिकांचा प्रतिसाद मिळाला आहे.
गणेशमूर्तींचे विसर्जन नैसर्गिक जलस्रोतांमध्ये न करता पर्यावरणपूरक पद्धतीने करता यावे, यासाठी महापालिकेच्या वतीने एकूण ६३ कृत्रिम विसर्जन तलाव तयार करण्यात आले होते. या माध्यमातून सुमारे १ लाख ४१ हजार २४६ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले असून, यामध्ये सुमारे ३८ हजार ८६ पर्यावरणपूरक म्हणजेच शाडू मातीच्या गणेशमूर्तींचा समावेश आहे.
क्षेत्रीय कार्यालयनिहाय उपलब्ध आकडेवारीनुसार, अ क्षेत्रीय कार्यालयात १२ हजार ७८०, ब क्षेत्रीय कार्यालयात २० हजार ५२३, क क्षेत्रीय कार्यालयात १२ हजार ३७२, ड क्षेत्रीय कार्यालयात १२ हजार ८०, इ क्षेत्रीय कार्यालयात १५ हजार ४२०, फ क्षेत्रीय कार्यालयात ७ हजार ३०८, ग क्षेत्रीय कार्यालयात १० हजार २८, ह क्षेत्रीय कार्यालयात १२ हजार ९६, ज क्षेत्रीय कार्यालयात २६ हजार ५२३ आणि ल क्षेत्रीय कार्यालयात १२ हजार ११६ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.गणेशोत्सवाच्या कालावधीत एकूण ६७ हजार ७७९.४५ किलो म्हणजेच सुमारे ६७.७८ मेट्रिक टन निर्माल्याचे संकलन करण्यात आले आहे.
फुले, हार आणि अन्य निर्माल्य स्वतंत्रपणे संकलित करून त्याचे योग्य व्यवस्थापन व प्रक्रिया करण्यावर भर देण्यात आला. निर्माल्य जलस्रोतांमध्ये न टाकता स्वतंत्रपणे संकलित केल्यामुळे जलप्रदूषण कमी करण्यास मदत झाली.
पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महापालिकेच्या वतीने शाडू मातीच्या पुनर्वापरावरही भर देण्यात आला. उपलब्ध नोंदीनुसार १ हजार ७७१ किलो शाडू मातीचे संकलन करण्यात आले आहे. तसेच ११ हजार ४८९ किलो माती पुनर्वापरासाठी स्वयंसेवी संस्थांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.गणेशमूर्ती विसर्जनानंतर उपलब्ध होणार्या शाडू मातीचा योग्य प्रकारे पुनर्वापर व्हावा, यासाठी नागरिक तसेच स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून मातीचा पुनर्वापर करण्यास प्रोत्साहन देण्यात आले. पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या वापरासोबतच विसर्जनानंतर उपलब्ध होणार्या मातीचे पुनर्चक्रण करण्याच्या संकल्पनेला यामुळे चालना मिळाली.
Related
Articles
जिवातील दोन रेणू एकसारखे भासले तरी गुणधर्म मात्र भिन्न
07 Oct 2026
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
03 Oct 2026
भारताच्या ‘बिग कॅट अलायन्स’मध्ये घाना
09 Oct 2026
इराकच्या चलनाचे आणखी अवमूल्यन
08 Oct 2026
मार्केटयार्डात ‘नो यूपीआय’आंदोलन यशस्वी
03 Oct 2026
जंतर- मंतर परिसरात पुन्हा आंदोलन
03 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान