E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
वायसीएमच्या रुग्णालयाच्या अधिष्ठात्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा
Samruddhi Dhayagude
29 Sep 2026
माजी सहायक प्राध्यापक डॉक्टरचा जातिवाचक शब्द वापरून अपमान
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील माजी सहायक प्राध्यापक डॉक्टरला जातीवाचक शब्द वापरून अपमानित केल्याप्रकरणी रुग्णालयाच्या अधिष्ठात्याविरोधात संत तुकारामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान फिर्यादी यांना रुग्णालयातून सेवेतून कमी करण्यात आल्याने वाद सुरु होते. मात्र फिर्यादी डॉक्टरने रुग्णालयात हृदयरोगाची सेवा चांगल्या पद्धतीने दिल्यास शहरातील इतर खासगी रुग्णालयांचा व्यवसाय बंद पडेल, या कारणातूनही आपल्याविरोधात कारवाया केल्या जात असल्याचा आरोप फिर्यादीत केल्याने रुग्णालय तसेच शहरातील वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी ज्ञानेश्वर बोराडे (वय ४५, रा. धायरी, पुणे) यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र नामदेव वाबळे (रा. वल्लभनगर, पिंपरी) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३५२ तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. सेवेत रुजू होणे, गैरहजेरी, विभागीय चौकशी आणि सेवेतून कमी करण्याच्या कारवाईवरून त्यांचा डॉ. राजेंद्र वाबळे यांच्याशी वाद सुरू होता. फिर्यादी यांनी यासंदर्भात विविध शासकीय तसेच वैद्यकीय संस्थांकडे तक्रारी केल्या आहेत.
दरम्यान, १० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास फिर्यादी अनुभव प्रमाणपत्र घेण्यासाठी वायसीएम रुग्णालयात गेले होते. दुसर्या मजल्यावरील लिफ्टसमोर डॉ. वाबळे भेटले. अनुभव प्रमाणपत्रातील नियुक्तीबाबतच्या नोंदीवरून विचारणा केली असता डॉ. वाबळे यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सेवेतून कमी केल्याचा उल्लेख करीत फिर्यादी यांना जातीवाचक शब्द वापरून अपमान केला. त्यावेळी काही रुग्ण तसेच इतर व्यक्ती तेथे उपस्थित होते.
फिर्यादी डॉक्टर हे हृदयाशी संबंधित आजारांवर उपचार करतात. ते वायसीएममध्ये कार्यरत असताना त्यांनी केलेल्या उपचाराचा अनेक रुग्णांना फायदा होत होता. त्यामुळे त्यांच्याकडे उपचारासाठी येणार्या रुग्णांची संख्या वाढू लागली होती. याचा वायसीएम परिसरात सुरू असलेल्या रुबी अलकेयर या खाजगी हॉस्पिटलची हानी होऊन त्यांना भविष्यात काढून टाकले जाईल. त्यातून डॉ. वाबळे यांचे आर्थिक हितसंबंध धोक्यात येतील म्हणून त्यांनी संबंधित डॉक्टरवर प्रशासकीय कारवाई केली असल्याचा आरोप फिर्यादी डॉक्टरने केला आहे. संत तुकारामनगर पोलीस तपास करत आहेत.
Related
Articles
‘नाना’ हे विचारांचे मोहोळ; बळकट आवाज हरपला
09 Oct 2026
महिला नेत्यांसाठी एआय आधारित नवे व्यासपीठ
09 Oct 2026
प्रामाणिक उमेदवारांच्या नियुक्त्या रखडवू नका
11 Oct 2026
महामार्गांवरील अपघातग्रस्तांसाठी हवाई रुग्णवाहिका
14 Oct 2026
आंदोलनापूर्वीच पुण्यात पोलिसांकडून धरपकड
12 Oct 2026
युक्रेनचा अध्यक्ष बदलण्याची गरज : ट्रम्प
12 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात