E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
बाणेर-पाषाण लिंक रस्त्याचे भूसंपादन पूर्ण
Samruddhi Dhayagude
29 Sep 2026
अंतिम निवाडा जाहीर; मोबदला अदा केल्यानंतर ताबा घेण्याची कार्यवाही सुरू
पुणे : पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या बाणेर-पाषाण लिंक रोडच्या भूसंपादनाचा तिढा अखेर सुटला आहे. मागील १५ वर्षांपासून रेंगाळेलेली भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, या रस्त्याबाबतचा अंतिम निवाडा जाहीर झाला आहे. त्यानंतर सोमवारी महानगरपालिकेकडून प्रत्यक्ष जागेचा ताबा घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
पुणे शहराच्या मंजूर विकास आराखड्यानुसार मौजे पेठ पाषाण, येथील सर्व्हे क्र. १३४ (पै.), १३८ व १४० मधून जाणार्या ३६ मीटर रुंदीच्या विकास योजना रस्त्याचे (बाणेर-पाषाण लिंक रोड) काम भूसंपादनाअभावी दीर्घकाळापासून रखडले होते.
या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली भूसंपादनाची कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, महानगरपालिकेमार्फत संबंधित भूसंपादित जमिनीच्या मोबदल्यापोटी सुमारे ६८ कोटी रुपयांची भरपाई रक्कम वर्ग करण्यात आली आहे. त्यानंतर जिल्हा प्रशासनामार्फत अंतिम निवाडा जाहीर करण्यात आला.
कायदेशीर व आर्थिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर आज प्रत्यक्ष जागेवर जाऊन अधिकृत ताबा घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या भूसंपादनामुळे बाणेर, पाषाण, सुतारवाडी तसेच परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, या भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होणार आहे.
जागेचा प्रत्यक्ष ताबा घेण्याची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर पथ विभागामार्फत रस्त्याचे उर्वरित काम तातडीने हाती घेण्यात येणार असून, हा रस्ता लवकरात लवकर नागरिकांच्या सेवेत खुला करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
Related
Articles
तरुणाईच्या आंदोलनांनी सरकार बेजार
06 Oct 2026
कुसल मेंडिस श्रीलंकेचा कसोटी कर्णधार
09 Oct 2026
राहुल आणि प्रियांका यांचे ठिय्या आंदोलन
07 Oct 2026
इंद्रायणीच्या काठावर अश्रूंचा पूर; विद्यार्थ्यांना अखेरचा निरोप
03 Oct 2026
पुढील महिन्यात पंतप्रधान बारामतीत
04 Oct 2026
मुंबई- बंगळुरू वंदे भारत स्लीपर रेल्वे सोलापूर मार्गे धावणार
06 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान