E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
थेट वाहतूक धोरणाची अंमलबजावणी तात्काळ थांबवा!
Samruddhi Dhayagude
29 Sep 2026
शासकीय धान्य गोदामातील हमाल-माथाडींचे धरणे आंदोलन सुरू
पुणे : शासकीय धान्य गोदामांमधील हमाल-माथाडी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शासकीय धान्य गोदाम हमाल माथाडी कामगार संघटनांची संयुक्त कृती समिती आक्रमक झाली आहे. या समितीने विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात राज्यातील विविध शासकीय धान्य गोदामांमधील हमाल-माथाडी कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
शासकीय धान्य गोदामांमध्ये थेट वाहतूक धोरणाची अंमलबजावणी करून खासगी वाहतूक कंत्राटदारामार्फत कामे करण्याचा निर्णय तात्काळ थांबवावा, अशी प्रमुख मागणी संयुक्त कृती समितीने केली आहे. या धोरणामुळे राज्यातील सुमारे दहा हजार हमाल-माथाडी कामगारांच्या रोजगारावर गदा येण्याची शक्यता असल्याचा दावा समितीने केला आहे.
या संदर्भात जिल्हा पुरवठा अधिकार्यांना देण्यात आलेल्या निवेदनात विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. थेट वाहतूक धोरणांतर्गत होणारी हमालीची कामे संबंधित गोदामात पूर्वीपासून कार्यरत असलेल्या तसेच माथाडी मंडळाकडे नोंद असलेल्या हमालांकडूनच करून घ्यावीत, तसेच त्याबाबत वाहतूक कंत्राटदारावर स्पष्ट बंधन घालण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच माथाडी कायद्यानुसार माथाडी मंडळाने निश्चित केलेले मजुरीचे दर आणि त्यावरील लेव्हीची रक्कम भरण्याची जबाबदारी वाहतूक कंत्राटदारावर निश्चित करावी.
शासकीय धान्य गोदामातील हमालांच्या मजुरीमध्ये महागाई निर्देशांकानुसार होणारा फरक कंत्राटदाराकडे न ठेवता थेट माथाडी मंडळाकडे जमा करण्यात यावा. कामगारांच्या प्रलंबित हमालीची मजुरी व लेव्हीची रक्कमही तातडीने माथाडी मंडळाकडे जमा करण्यात यावी, या मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही समितीने दिला आहे.
या आंदोलनात राजकुमार घायाळ, सुभाष लोमटे, विकास मगदूम, निवृत्ती धुमाळ, अरुण रांजणे, शिवाजी शिंदे, गोरख मेंगडे, अंकुश अवताडे, विष्णू गर्जे, संदीप धायगुडे, संदीप मारणे, अनिल डोंबाळे, हुसेन पठाण, चंद्रकांत मानकर, गंगाराम कोळेकर, सुधीर पोर्टे, रमजान शेख, हणुमंंत बहिरट, यांच्यासह संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी व कामगार सहभागी झाले आहेत.
या आंदोलनात ट्रान्सपोर्ट अँड डोकं वर्कर्स युनियन, मुंबई, महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ, महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट अँड जनरल कामगार युनियन, अखिल भारतीय माथाडी सुरक्षा रक्षक श्रमजीवी आणि जनरल कामगार युनियन, अखिल भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट अँड जनरल कामगार युनियन, मराठवाडा हमाल माथाडी मजदूर युनियन आदी संघटना सहभागी झाल्या आहेत.
Related
Articles
सिंहिणींसह छाव्यांना जीवदान
08 Oct 2026
मतदानाच्या हक्काचा प्रश्न (अग्रलेख)
08 Oct 2026
सर्वोच्च न्यायालयावर आज राहुल यांचा मोर्चा
12 Oct 2026
खडकवासला धरण परिसरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्सचे सांडपाणी थेट धरणात
14 Oct 2026
पाकिस्तानात रेल्वेचे १४ डबे घसरून सहा जणांचा मृत्यू
14 Oct 2026
गरिबांच्या जेवणाची जबाबदारी केंद्रचालकांच्या खिशावर
09 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात