E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
ज्ञानेश कुमार यांना सेवेतून बडतर्फ करा : प्रशांत जगताप
Samruddhi Dhayagude
29 Sep 2026
पुणे : लोकशाहीची नव्हे, तर केवळ सत्तेची गुलामी करण्यात भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार व्यस्त आहेत. मतदार यादीतून कोट्यवधी पात्र मतदारांना बाद करण्याचे, ऐन निवडणुकीत पात्र उमेदवारांना अपात्र ठरवण्याचे, सत्ताधार्यांच्या अपात्र उमेदवारांना पात्र ठरवण्याचे पाप याच ज्ञानेश कुमार यांनी केले आहे. त्यांच्या पापाचा घडा आता भरला आहे, म्हणूनच इतर २ निवडणूक आयुक्तांनी गेल्या १० महिन्यांत १४ वेळा मुख्य निवडणूक आयोगांच्या विविध निर्णयांबाबत असहमती, तरीही ज्ञानेश कुमार यांनी सत्तेची चाकरी करत आपले निर्णय रेटून नेले. निवडणूक आयोगाच्या या गुलामगिरीच्या विरोधात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पूर्व विभागाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.
निवडणूक आयोगच सत्ताधार्यांचे गुलाम असेल, तर आपली लोकशाही उद्ध्वस्त होईल, म्हणूनच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा पुणे भारतीय लोकशाहीच्या अस्तित्वासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. याबाबत उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदनही देण्यात आले.
या आंदोलनात सहभागी होत असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी, स्वाभिमानी पुणेकर नागरिकांनी निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभाराचा निषेध व्यक्त केला. तसेच, सत्तेच्या वळचणीला गेलेले मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा अशी सर्वांनी आग्रही मागणी केली.
यावेळी ज्येष्ठ नेते माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, नगरसेवक रफिक शेख, नगरसेविका आसिया मणियार, नगरसेविका सुमय्या नदाफ, लताताई राजगुरू, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष शिवा मंत्री, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष स्वाती शिंदे, युवक काँग्रेस अध्यक्ष सौरभ अमराळे, चंद्रशेखर कपोते, इंटक अध्यक्ष चेतन अगरवाल, सेवादलाचे अध्यक्ष लतेंद्र भिंगारे उपस्थित होते.
Related
Articles
मसापच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या बिनविरोध निवडीवर आक्षेप
13 Oct 2026
असंघटित कामगारांसाठी ‘ई-श्रम’ पोर्टल
13 Oct 2026
वर्षा विगत,शरद ऋतु आयी...
11 Oct 2026
जिल्हा स्तरावर ५०० विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह
09 Oct 2026
लढा सुरूच राहील : राहुल
14 Oct 2026
व्हॉट्सऍप कट्टा
09 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात