E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
चाकण नगरपरिषदेत निधीचा खडखडाट!
Samruddhi Dhayagude
29 Sep 2026
प्रशासन व सत्ताधार्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह
चाकण, (वार्ताहर) : चाकण नगरपरिषदेत विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षासोबत सामील असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. मात्र, आम्ही कोणत्याही राजकीय स्वार्थासाठी सत्ताधार्यांसोबत नसून, चाकण शहराच्या विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी आवश्यक त्या ठिकाणी सहकार्य करीत आहोत; परंतु, जनतेच्या पैशांचा अपव्यय अथवा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत दिला.
गटनेते साहेबराव कड, विरोधी पक्षनेते प्रकाश भुजबळ, नगरसेवक सागर बनकर, आकाश जाधव, करण सोनावणे, नगरसेविका विजया तोडकर, वर्षा शेवकरी, रेश्मा मुटके यांच्यासह किशोर जगनाडे, दत्तात्रय जाधव उपस्थित होते.
यावेळी साहेबराव कड म्हणाले, नगरपरिषदेकडून नुकतीच करण्यात आलेल्या अतिक्रमण कारवाईबाबत विरोधी पक्षातील नगरसेवकांना कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नाही. नगरपरिषदेत महत्त्वाच्या विषयाबाबत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना जाणीवपूर्वक माहिती दिली जात नाही. प्रशासनाने अशा बाबतीत पारदर्शकता ठेवली नाही, असा आरोप कड यांनी केला.
त्याचबरोबर नगरपरिषदेच्या आरोग्य विभागासाठी करण्यात येणार्या विविध साहित्य खरेदीवरही नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केले. विशेषतः झाडू खरेदीच्या निविदेतील दराबाबत आक्षेप नोंदविण्यात आला. बाजारात साधारणपणे १५० ते २०० रुपयांच्या दरात मिळणार्या झाडूसाठी वाढीव दराने झाडू खरेदी केला जात असल्याचे कळताच स्थायी समिती सदस्य नगरसेवक सागर बनकर यांनी साहित्य खरेदीला विरोध केला. जनतेच्या पैशातून होणार्या खरेदीमध्ये दरांची योग्य तपासणी करून आर्थिक शिस्त पाळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, नगरपरिषदेच्या आर्थिक स्थितीबाबतही विरोधी पक्षनेते प्रकाश भुजबळ यांनी सवाल उपस्थित केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रशासक राजवट येण्यापूर्वी नगरपरिषदेकडे जवळपास ४० कोटी रुपयांचा निधी असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, त्यानंतर या निधीचा नेमका वापर कसा झाला, याबाबत विरोधी पक्षाला स्पष्ट माहिती मिळालेली नाही. या निधीचा हिशेब जनतेसमोर मांडावा, अशी मागणी त्यांनी केली.
नगरपरिषदेच्या कारभारात आर्थिक शिस्त, पारदर्शकता आणि जनतेच्या पैशांचा योग्य वापर झाला नाही, तर भविष्यात नगरपरिषदेच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. ‘असेच सुरू राहिले तर चाकण नगरपरिषद दिवाळखोरीत जाण्यास वेळ लागणार नाही,’ असे संकेत यावेळी देण्यात आले. नगरपरिषदेच्या विविध खरेदी प्रक्रिया, अतिक्रमण कारवाई आणि आर्थिक व्यवहारांबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केली.
Related
Articles
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
07 Oct 2026
नरसिंग गिरजी गिरणीची दगडी भिंत केली जमीनदोस्त
08 Oct 2026
उत्सव संपताच फुलांच्या दरात मोठी घसरण
04 Oct 2026
सातार्यात ४१ गावे आणि २४० वाड्या तहानलेल्या
08 Oct 2026
अहमदाबादमध्ये दहा शाळांना बॉम्बची धमकी
08 Oct 2026
पितृ पंधरवाड्यामुळे फळभाज्यांना मागणी वाढली
03 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान