E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
भीमाशंकर कारखान्याकडून ऊस उत्पादकांना साखर वाटप
Samruddhi Dhayagude
29 Sep 2026
मंचर, (वार्ताहर) : पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामार्फत माजी सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही दीपावलीनिमित्त सभासद व ऊस उत्पादकांना गाव व गटनिहाय साखर वाटप करण्यात येणार आहे. २ ते १० ऑक्टोबर या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत प्रतिकिलो २० रुपये दराने साखरेचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
पूर्ण शेअर्स (१५ हजार रुपये) व ऊस पुरवठा केलेले सभासदांना ८० किलो, केवळ पूर्ण शेअर्स असलेल्या सभासदांना ५० किलो, अपूर्ण शेअर्स व ऊस पुरवठा केलेल्यांना ४० किलो, केवळ ऊस पुरवठा केलेल्यांना ४० किलो, तर केवळ अपूर्ण शेअर्सची रक्कम जमा केलेल्यांना ३० किलो साखर देण्यात येणार आहे. साखरेचे वाटप १०, २० व ५० किलो पॅकिंगमध्ये करण्यात येणार आहे. गावनिहाय व तारखेनिहाय साखर वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. सभासद व ऊस उत्पादकांनी नियोजित तारखेला साखर घेऊन जाऊन सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी केले आहे.
Related
Articles
खंडाळ्यात 74 लाखांचे कोकेन जप्त
08 Oct 2026
आत्महत्याग्रस्त माळी कुटुंबाला राजेंद्र राऊत यांनी दिला आधार
08 Oct 2026
प्राध्यापक, काँग्रेस खासदाराला लोकसभेतून निलंंबित करा
14 Oct 2026
यूपीआय शुल्काचे नियम समजून घ्या!
09 Oct 2026
भारताच्या ‘बिग कॅट अलायन्स’मध्ये घाना
09 Oct 2026
डेन्मार्क ओपन स्पर्धा
13 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात