E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
चाकण-हिंजवडीच्या १८०० कोटींच्या आराखड्याला मंजुरी
Samruddhi Dhayagude
29 Sep 2026
चाकणमध्ये १४०० कोटी तर हिंजवडीसाठी ४२६ कोटींची कामे प्रस्तावित
मुंबई, (प्रतिनिधी) : चाकण व हिंजवडीतील दुरवस्थेमुळे उद्योजकांनी स्थलांतराचा इशारा दिल्यानंतर जाग्या झालेल्या सरकारने येथील मूलभूत सुविधांची दुरुस्ती हाती घेण्याचे ठरवले आहे. चाकणमधील रस्ते, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्थापन, पावसाळी पाणी निचरा व्यवस्थापन आदींच्या सुधारणेसाठी १ हजार ४०० कोटींच्या आराखड्यास तसेच हिंजवडीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रस्तावित ४२६ कोटींच्या आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी तत्वतः मंजुरी दिली.
सह्याद्री अतिथीगृह येथे काल बैठकीत आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. चाकण आणि हिंजवडीतील प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी डिसेंबरपासून कामे सुरू करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे पुढील पावसाळ्यापूर्वी चाकणमधील वाहतूक आणि पाणी निचर्याच्या समस्यांमध्ये लक्षणीय सुधारणा करण्यात येणार असल्याची माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आराखड्याचे सादरीकरण करताना दिली.
चाकण, हिंजवडीतील सुमार दर्जाच्या रस्ते, वीज पुरवठा, पावसाचे साठणारे पाणी याला कंटाळून उद्योजकांनी उद्योगांचे स्थलांतर करण्याचा इशारा दिला होता.
या पाश्वरभूमीवर राज्य सरकारने चाकण औद्योगिक परिसरातील रस्ते दुरुस्ती, वाहतूक कोंडी निवारण आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी पुणे जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमली होती. त्यानुसार समितीने काल चाकण-हिंजवडी परिसरातील नागरी समस्या दूर करण्यासाठी राबवण्यात येणार्या उपाययोजनांची माहिती दिली.
कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित वाहतूक नियंत्रण
चाकण, तळेगाव आणि हिंजवडी परिसरातील वाहतूक व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अंमलबजावणी यंत्रणा उभारण्याचे नियोजन आहे. वाहतूक पोलिसांसोबत समन्वय साधून कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या माध्यमातून वाहतुकीचे नियंत्रण आणि नियमभंगावर कारवाई करण्यात येणार आहे. सीसीटीव्ही आणि इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) प्रकल्पालाही मंजुरी देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
हिंजवडीसाठी ४२६ कोटींचा आराखडा
हिंजवडीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ४२६ कोटींचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला आहे. हिंजवडीतील वीजपुरवठ्याच्या अडचणी दूर करण्यासाठी सहा एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, वाहतूक आणि अन्य व्यवस्थापनासाठी महाराष्ट्र सुरक्षा दलाचे १०० जवान उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
समन्वयातून कामे पूर्ण करण्याचे नियोजन
चाकणमधील पायाभूत सुविधा विकासासाठी एमआयडीसी, पीएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद आणि अन्य संबंधित यंत्रणांना एकत्रितपणे काम करावे. रस्ते, पावसाळी निचरा, वाहतूक व्यवस्थापन आणि सार्वजनिक सुविधांच्या कामांसाठी विविध विभागांच्या निधीचा आणि यंत्रणांचा समन्वय साधावा, अशी सूचना फडणवीस यांनी यावेळी केली.
Related
Articles
पदकांची लयलूट (अग्रलेख)
06 Oct 2026
भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी
09 Oct 2026
जर्मनीत हेरगिरीच्या आरोपाखाली माजी गुप्तचर प्रमुखाला अटक
08 Oct 2026
‘पुण्यातील आंदोलन म्हणजे महाराष्ट्राचे जंतर-मंतर’
05 Oct 2026
भरभरून कौतुक किंवा टोकाची टीका करण्याकडे कल : सोनाली कुलकर्णी
08 Oct 2026
शिव-शंभू विचारांचा गगनभेदी निनाद
05 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान