E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
कोकण, मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज
Samruddhi Dhayagude
29 Sep 2026
बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट
पुणे : मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाला सुरुवात झाली आहे. आज (मंगळवारी) कोकणासह मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत मेघगर्जना व विजांच्या कडकडाटत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
गोव्यासह संपूर्ण राज्यात पावसाचा अंदाज आहे. पुणे व सातारा जिल्ह्याचा घाट विभागत तसेच सांगली जिल्ह्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटात सोसाट्याच्या वार्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरी, नाशिकचा घाट विभाग, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वार्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. त्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यातील घाट विभागातही आज पाऊस पडणार आहे. अनेक भागात मागील बर्याच दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. आज आणि उद्या (बुधवारी) हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच काही भागात ढगाळ वातावरणासह मेघगर्जना होणार आहे. विदर्भ, मराठवाड्याला मात्र पावसासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. पुणे व परिसरात दोन दिवस आकाश मुख्यत: नीरभ्र असणार आहे. सायंकाळी अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मेघगर्जना व विजांच्या कडकडाटात हलक्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
पुण्यात जोरदार पाऊस
सुमारे आठवडाभराच्या विश्रांतीनंतर काल शहरासह उपनगरात आर्धा तास जोरदार पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसामुळे घराबाहेर पडलेल्या नागरिकांची गैरसोय झाली. अनेकांना आहे त्या ठिकाणी थांबावे लागले. मध्यवस्तीतील व्यवहारही काही काळासाठी मंदावले. पावसामुळे रस्त्यांवरील वाहनांसह लोकांची गर्दी कमी झाली. रस्त्यांवर थांबून विविध वस्तू व खाद्यपदार्थांची विक्री करणार्यांची मात्र साहित्याची आवराआवर करताना धावपळ झाली. शिवाजीनगर भागात काल १२.७ मिमी, पाषाण २ मिमी, तर हडपसर १ मिमी पावसाची नोंद झाली.
विदर्भ, मराठवाडा कोरडाच
आज (मंगळवारी) कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज नसल्याने हा भाग कोरडाच असणार आहे. दीर्घ काळापासून या भागात पावसाने पाठ फिरविली आहे. पुढील काही दिवस या भागात पावसाचा अंदाज नाही. त्यामुळे आतापासूनच पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून शेतीचा प्रश्न बिकट आहे. पावसाअभावी महागाईत मोठी भर पडणार असल्याचा अंदाजही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
Related
Articles
वाचक लिहितात
07 Oct 2026
भाजपचे राज्यसभेसाठी आठ उमेदवार जाहीर
06 Oct 2026
ज्ञानेश कुमार यांच्या हकालपट्टीसह राज्यातील ’एसआयआर’ रद्द करा
05 Oct 2026
भारतातील भूजलात सतत घट
05 Oct 2026
चांदिवाल आयोगाचा अहवाल जाहीर करा
07 Oct 2026
कादंबरीकार जेफ्री आर्चर यांचे निधन
07 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान