E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
तृणमूलच्या नाव आणि चिन्हाबाबत चार महिन्यांत निर्णय?
Samruddhi Dhayagude
29 Sep 2026
नवी दिल्ली : ’ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’च्या (टीएमसी) दोन गटांमध्ये पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हावर वाद सुरू आहे. हा वाद सोडविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगासाठी कालमर्यादा निश्चित केली आहे.
या बाबत दोन्ही गटांना आपले म्हणणे मांडण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ दिला आहे. त्यानंतर, तीन महिन्यांत यावर निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. सरन्यायाधीश सूर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या पीठासमोर याबाबतची सुनावणी सुरू आहे.
नाव आणि पक्षाचे चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तृणमूलमध्ये फूट पडली असून दोन्ही गटांकडून नाव आणि पक्षाच्या चिन्हावर दावा केला जात आहे. त्यातच राज्यात दोन जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने नाव आणि चिन्ह गोठविण्याचा हंगामी निर्णय घेतला असून, दोन्ही गटांना स्वतंत्र नावे आणि चिन्हे दिली आहेत. पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील नंदिग्राम आणि मुर्शिदाबाद जिल्ह्यातील रेजीनगरसाठी ६ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून, ९ ऑक्टोबर रोजी मतमोजणीनंतर निकाल जाहीर होणार आहे. तृणमूलच्या नंदिग्राममधील उमेदवारने अचानक माघार घेतली असून, काँग्रेसच्या उमेदवारास दोन दशकांपूर्वीच्या एका गुन्ह्यात अटक झाली आहे.
Related
Articles
खरीप पिके करपली; हंगाम हातचा गेला
11 Oct 2026
हॉलीवूड अभिनेते मिट्टे यांचे निधन
14 Oct 2026
असंघटित कामगारांसाठी ‘ई-श्रम’ पोर्टल
13 Oct 2026
जीएसटी अधिकार्यांचे अटकेचे अधिकार रद्द
09 Oct 2026
देशात अराजकता पसरवण्याचे आंतरराष्ट्रीय कारस्थान
14 Oct 2026
‘आयुष्मान’ कार्डबाबतची अडचण दूर
12 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात