दहा कोटींचे सोने जप्त   

नवी दिल्ली : देशभर सोन्याच्या चोरट्या व्यापाराचे जाळे नष्ट करण्यात आले असून त्या अंतर्गत सुमारे ६.६१ किलो आणि दहा कोटींचे सोने जप्त करण्यात आले. या प्रकरणी ११ जणांना अटक केली आहे. महसूल गुप्तचर संचालकांनी देशव्यापी मोहीम राबवली होती. त्या माध्यमातून परदेशातून चोरटा व्यापार करून आणलेले सोने जप्त केले आहे. गेल्या नऊ महिन्यांत कुरिअर जाळ्याचा वापर करून ३१८ किलोचे सुमारे ४७५ कोटी रुपयांचे सोने बेकायदा आणले होते, असे तपासात उघड झाले होते. भारत आणि बांगला देश सीमेवरून सोन्याचा चोरटा व्यापार होत असल्याचा सुगावा गुप्तचरांना लागला होता. बेकायदा सोने आणून ते देशभरात पाठवले जात होते. त्यासाठी कुरिअर सेवेचा वापर केला जात होता. २३ आणि २४ सप्टेंबर दरम्यान, मुंबई, दिल्ली, कोलकाता, अहमदाबाद आणि गुवाहाटीत छापे घातले आणि ते जप्त केले असल्याची माहिती देण्यात आली. ज्या कुरिअरमधून ते पाठवले होते ते जप्त केले होेते. 

Related Articles