E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
बालकांना सोन्याची अंगठी देऊन विजय बनले ‘मामा’
Samruddhi Dhayagude
29 Sep 2026
चेन्नई : तामिळनाडूत नवजात बालकांना सोन्याची अंगठी देण्याची योजना सोमवारपासून सुरू झाली आहे. या योजनेला मुख्यमंत्री विजय यांच्या हस्ते प्रारंभ झाला आहे. या उपक्रमामुळे विजय हे बालकांचे आता मामा बनले आहेत.
विधानसभा निवडणुकीत सत्ता आल्यास अशी योजना सुरू करण्याचे आश्वासन टीव्हीकेचे नेते आणि मुख्यमंत्री विजय यांनी केले होते. त्यानुसार कालपासून ’२२-कॅरेट एक-ग्रॅम सोन्याची अंगठी’ देणारी योजना सुरू केली. मामाकडून सुवर्ण अंगठी योजना’ (थाईमामन थंगा मोथिरम थिट्टम) सुरू केली. येथील सरकारी राजाजी रुग्णालयात या योजनेला सुरुवात करताना, विजय यांनी बालकांना कडेवर घेतले होेते. त्यांना सोन्याच्या अंगठ्या भेट दिल्या. योजनेसाठी सरकारने ७५५.८३ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मातृत्वाचा सन्मान करणे, महिलांच्या आरोग्याला चालना देणे आणि कुटुंबांना सार्वजनिक आरोग्यसेवेकडे आकर्षित करून संस्थात्मक प्रसूतीला प्रोत्साहन देणे हा योजनेचा उद्देश आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये जन्मलेल्या आणि स्थानिक मातांच्या मुलांना अंगठ्या देण्याच्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या टप्प्यासाठी राज्य सरकारने आधीच १.२८ लाख सोन्याच्या अंगठ्यांची खरेदी केली आहे. ही योजना २२ जून २०२६ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या पात्र बालकांसाठी लागू असेल.
Related
Articles
बिहारमध्ये मुलींची सुरक्षितता कुठे हरवली....?
11 Oct 2026
जपानची भारतात ५.७१ अब्ज डॉलरची गुंतवणूक
12 Oct 2026
मुख्य निवडणूक अधिकार्यांच्या कार्यालयाबाहेर ‘आप’चे आंदोलन
08 Oct 2026
सलग दुसर्या दिवशी काँग्रेस आक्रमक
08 Oct 2026
लावणीच्या रंगमंचावरची तेजस्वी ज्योत
13 Oct 2026
बांगलादेशी नागरिकांना अटक
12 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात