E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
बचत खात्यावर कुठे मिळते जादा व्याज
Samruddhi Dhayagude
29 Sep 2026
वृत्तवेध
सणासुदीच्या हंगामाला सुरुवात होत असतानाच सप्टेंबरमध्ये अनेक बँकांनी बचत खात्यांवरील व्याजदरात बदल केले आहेत. दैनंदिन खर्च तसेच आपत्कालीन निधीसाठी मोठ्या प्रमाणावर बचत खात्यांचा वापर केला जातो. त्यामुळे आपल्या बचतीवर कोणती बँक किती व्याज देत आहे, याकडे ग्राहकांचे सतत लक्ष असते.
सरकारी क्षेत्रातील कॅनरा बँक आणि ‘बँक ऑफ इंडिया’ तसेच खासगी क्षेत्रातील ‘आयडीएफसी फर्स्ट बँक’ यांच्या बचत खात्यांवरील व्याजदरात बदल करण्यात आले आहेत. यामध्ये ‘आयडीएफसी फर्स्ट बँक’ ठरावीक रकमेवर सात टक्क्यांपर्यंत वार्षिक व्याज देत आहे. सरकारी क्षेत्रातील कॅनरा बँकेने बचत खात्यांवरील व्याजदरात बदल केला आहे. हे नवे दर ५ सप्टेंबरपासून लागू झाले आहेत. नव्या दरानुसार, खात्यात शंभर कोटी रुपयांपर्यंतची शिल्लक असल्यास वार्षिक २.५० टक्के व्याज मिळेल. शंभर कोटींपेक्षा अधिक आणि तीनशे कोटी रुपयांपेक्षा कमी शिल्लक असल्यास व्याजदर २.६५ टक्के आहे. तसेच तीनशे कोटींपेक्षा अधिक आणि पाचशे कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेवर ३.१० टक्के वार्षिक व्याज मिळणार आहे.
सरकारी क्षेत्रातील ‘बँक ऑफ इंडिया’ने बचत खात्यांवरील व्याजदरात बदल केला असून, नवे दर एक सप्टेंबरपासून लागू झाले आहेत. बँकेनुसार, ५० कोटी रुपयांपर्यंतच्या शिलकीवर २.५० टक्के वार्षिक व्याज दिले जात आहे. ५० कोटींपेक्षा अधिक आणि २५० कोटी रुपयांपर्यंतच्या शिलकीवर २.६० टक्के व्याज मिळेल. २५० कोटींपेक्षा अधिक आणि पाचशे कोटी रुपयांपर्यंतच्या रकमेवर व्याजदर २.७५ टक्के आहे. त्यापुढे पाचशे कोटींपेक्षा अधिक आणि एक हजार कोटी रुपयांपर्यंतच्या शिलकीवर तीन टक्के व्याज देण्यात येणार आहे, तर एक हजार कोटींपेक्षा अधिक आणि दीड हजार कोटी रुपयांपर्यंतच्या शिलकीवर ३.१५ टक्के वार्षिक व्याज मिळेल. खासगी क्षेत्रातील ‘आयडीएफसी फर्स्ट बँके’नेही एक सप्टेंबरपासून बचत खात्यांच्या व्याजदरात बदल केला आहे. सामान्य ग्राहकांसाठी तीन लाख रुपयांपर्यंतच्या शिल्लकीवर २.५० टक्के वार्षिक व्याज मिळेल; मात्र खात्यात तीन लाख रुपयांपेक्षा अधिक आणि २५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम असल्यास बँक सात टक्के वार्षिक व्याज देत आहे.
Related
Articles
राहुल यांनी गैरवर्तन केल्याचा गर्भवती पत्रकाराचा आरोप
14 Oct 2026
बाजार बंद ठेवण्याचा कामगार संघटनेचा इशारा
13 Oct 2026
हॉलीवूड अभिनेते मिट्टे यांचे निधन
14 Oct 2026
आंदोलनापूर्वीच पुण्यात पोलिसांकडून धरपकड
12 Oct 2026
देशात अराजक निर्माण करण्याचे काँग्रेसचे कारस्थान
13 Oct 2026
यूपीआय शुल्काचे नियम समजून घ्या!
09 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात