E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
दोषी कोण? (अग्रलेख)
Samruddhi Dhayagude
29 Sep 2026
गणेशोत्सव तोंडावर आल्यावर महापालिकेकडून गणेश मंडळांच्या बैठका घेतल्या जातात. त्यातून उपचार पार पाडल्याच्या समाधानाशिवाय फार काही निष्पन्न होत नाही. नियमपालन, शिस्त, नागरिकांची गैरसोय टाळणे, यादृष्टीने प्रबोधनासाठी सातत्याने प्रयत्न आवश्यक आहेत.
पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक रेंगाळत राहते, हा नेहमीचा अनुभव. हे वर्षदेखील याला अपवाद ठरले नाही. तब्बल साडेतेहतीस तास विसर्जन मिरवणूक सुरु होती. अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी सुरु झालेली ही मिरवणूक संपण्यास दुसरी दिवशी सायंकाळ उलटून गेली. गेल्या वर्षीच्या तुलनेत मानाच्या गणपतींचे विसर्जन सव्वा तास लवकर झाले तरी मुख्य मिरवणूक संपण्यास विलंब झाला. न्यायालयाच्या निर्णयानुसार रात्री बारानंतर ध्वनीक्षेपक बंद करण्यात आल्यानंतर अनेक मंडळांनी मिरवणुका जागेवरच थांबवल्याने मिरवणुकीचा वेग मंदावला. डीजेच्या दणदणाटाशिवाय मिरवणुका नाहीत, ही असंख्य गणेश मंडळांची भूमिका अस्वस्थ करणारी आहे. यातूनच नियम धुडकावले जातात आणि मिरवणूक लवकर संपविण्याचे आवाहन मुठेच्या पात्रात हरवून जाते. सार्वजनिक गणेशोत्सव हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे वैभव. नयनाकर्षक देखावे, देखाव्यांतून होणारे कलात्मकतेचे दर्शन हे अनुभवण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून उत्सवाच्या काळात पुण्यामध्ये जनसागर लोटतो. हा प्रतिसाद उत्सवाची श्रीमंती आणखी वाढवणारा ठरतो. अशा वेळी विसर्जन मिरवणूक उत्सवाचे मांगल्य जपणारी असावी, ही अपेक्षा वावगी नाही; पण यासाठी ज्यांनी पुढाकार घेणे नैसर्गिक ठरावे, असे लोकप्रतिनिधी न्याय्य आवाज उचलून धरताना दिसत नाहीत.
विचार मंथन हवे!
पुणे महापालिकेने बोलाविलेल्या गणेश मंडळांच्या बैठकीत पुणेकरांची प्रातिनिधिक भावना मांडू पाहणार्या विद्यानंद बापट यांना अडवण्यात आले. त्यांच्यावर टीका आणि हल्लाही झाला. सर्वसामान्य पुणेकरांना डीजेच्या कर्कश आवाजाचा त्रास होतो, ही त्यांनी मांडलेली भूमिका संपूर्ण उत्सवाच्या काळात सार्वजनिक चर्चेच्या केंद्रस्थानी राहिली. या भूमिकेस विवेकी पुणेकरांनी पाठिंबा दिला तरी उत्सवाच्या काळात, विशेषत: विसर्जन मिरवणुकीत त्याचा परिणाम दिसला नाही. या संदर्भात आणखी बरीच मजल मारावी लागणार आहे, विचारमंथन सुरुच ठेवावे लागणार आहे, हे यातून स्पष्ट झाले. नियम असतात, कायदे असतात, मात्र उत्सवाच्या काळात अस्वस्थता वाढण्याची कृती पोलिस दलाकडून सहसा टाळली जाते. मिरवणुकीत नियमभंग करणार्यांवर आता कारवाई होईल, मात्र यातून अपेक्षित शिस्त लागत नाही, ही वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे. मुख्य मिरवणूक जाणार्या लक्ष्मी रस्त्यावर सर्व चौकांमध्ये ध्वनिमर्यादा ओलांडली गेली. डीजेचा दणदणाट कानाचे पडदे फाडणारा होता. ढोल-ताशांची पथके, डीजे, डॉल्बी आणि ध्वनिक्षेपकांचे रचलेले थर यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात हादरे बसत होते. गेल्या वर्षी मिरवणुकीतील ध्वनीपातळी ९२.६ डेसिबल होती. त्या तुलनेत या वर्षी ध्वनीच्या सरासरी पातळीत वाढ होऊन ती १०४.५ अशी नोंदली गेली आहे. कानठळ्या बसविणारा हा कालावधी बेभान होऊन नाचणार्या कार्यकर्त्यांव्यतिरिक्त इतरांसाठी असह्य होता. यात भर म्हणजे अर्थहीन आणि अश्लील गाण्यांची चलती. अभिरुचीचे बदललेले हे दर्शन आजचे नाही, हे मात्र आवर्जून नमूद करणे आवश्यक आहे. नियमानुसार मध्यरात्री १२ वाजता गणेश मंडळे जागेवर थांबतात आणि दुसर्या दिवशी सकाळी ६ नंतर पुन्हा डीजे लावून मिरवणूक सुरू होते, हे भूषणावह नाही. मंडळांचे प्रबोधन करण्याची लोकप्रतिनिधींची इच्छा नाही अथवा त्यांना मर्यादा आहेत, हे वास्तव होय. लक्ष्मी रस्ता आणि मध्यभागातील अन्य परिसर पुणे महानगराच्या जीवनवाहिनीप्रमाणे आहे. तो बंद राहिल्याचा फटका संपूर्ण शहराला बसतो. रुग्णवाहिका आणि अन्य अत्यावश्यक सेवा पार कोलमडून पडतात. यंदाची गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक अधिक शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध करू, असा दावा पोलिसांनी केला होता. तो फोल ठरला आणि नियोजन कागदावरच राहिले; मात्र याचा सरसकट दोष पोलिसांवर ढकलता येणार नाही. ढोल पथकांतील संख्येपासून अनेक नियम पोलिसांनी केले, मात्र ते धाब्यावर बसविण्यात आले. ही मानसिकता बदलली गेली, तरच मिरवणूक लवकर संपण्याची अपेक्षा करता येईल.
Related
Articles
ब्रिटिशकालीन पूल होणार इतिहासजमा
08 Oct 2026
काळ्या समुद्रात पुन्हा जहाजावर हल्ला
08 Oct 2026
‘युनायटेड’ किंग्डम फुटणार...?
04 Oct 2026
सह्याद्रीच्या व्याघ्रप्रकल्प आराखड्याला मंजुरीची प्रतीक्षा
08 Oct 2026
पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात चोरी
06 Oct 2026
युपीआय व्यवहारांवरील शुल्काच्या विरोधात आडत्यांचे आंदोलन
06 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान