E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची पहिली फेरी जाहीर
Samruddhi Dhayagude
29 Sep 2026
पुणे : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी आयुष वैद्यकीय शिक्षणातील आयुर्वेद (बीएएमएस), होमिओपॅथी (बीएचएमएस) आणि युनानी (बीयुएमएस) अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची पहिली जागावाटप यादी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील १६६ वैद्यकीय महाविद्यालयांतील ११ हजार २७२ जागांपैकी १० हजार ५१९ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. ७५३ जागा रिक्त असून, या जागा पुढील फेरीसाठी उपलब्ध राहणार आहेत.
आयुर्वेदातील बीएएमएस अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीत राज्यातील ११३ वैद्यकीय महाविद्यालयांमधील ७ हजार ६८९ जागांपैकी ७ हजार ५४६ जागांचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये १६ शासकीय महाविद्यालयांतील १ हजार १९६ जागांपैकी १ हजार १५७, तर ९७ खासगी महाविद्यालयांतील ६ हजार ४९३ जागांपैकी ६ हजार ३८९ जागांचे वाटप झाले आहे. एकूण १४३ जागा रिक्त आहेत.
होमिओपॅथीतील बीएचएमएस अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीत राज्यातील ४८ महाविद्यालयांमधील ३ हजार ३३३ जागांपैकी २ हजार ७२७ जागांचे वाटप झाले आहे. यामध्ये दोन शासकीय महाविद्यालयांतील १३९ जागांपैकी १३४, तर ४६ खासगी महाविद्यालयांतील ३ हजार १९४ जागांपैकी २ हजार ५९३ जागांचे वाटप करण्यात आले. एकूण ६०६ जागा रिक्त आहेत.
युनानीतील बीयुएमएस अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीत राज्यातील पाच महाविद्यालयांमधील २५० जागांपैकी २४६ जागांचे वाटप झाले आहे. दोन शासकीय महाविद्यालयांतील सर्व १०२ जागांवर प्रवेशाची संधी मिळाली आहे. तीन खासगी महाविद्यालयांतील १४८ जागांपैकी १४४ जागांचे वाटप झाले असून, चार जागा रिक्त आहेत.
१ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश निश्चित करणे आवश्यक. पहिल्या फेरीत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांनी २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत आवश्यक मूळ कागदपत्रे आणि शुल्काचा धनादेश घेऊन संबंधित महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.
Related
Articles
जर्मनीत हेरगिरीच्या आरोपाखाली माजी गुप्तचर प्रमुखाला अटक
08 Oct 2026
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
09 Oct 2026
न्यायालयाच्या निर्देशानंतरही विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच
08 Oct 2026
पावणेतीन लाख नागरिकांना १५० टँकरने पाणी
05 Oct 2026
दुष्काळग्रस्त भागातील पात्र लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य
09 Oct 2026
अटी मान्य झाल्यास सात दिवसांत होर्मुझ खुली करू
05 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान