पंजाब विद्यापीठात नीरव शांतता   

 

दहा दिवस वर्ग बंद; विद्यार्थी घरी परतले
 
फगवाडा : पंजाबमधील लव्हली  प्रोफेशनल विद्यापीठाच्या आवारात सोमवारी नीरव शांतता होती. दहा दिवस वर्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पूर्वनियोजित परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी आता घरी परतू लागले आहेत. विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याचा संशय आणि तशी अफवा पसरल्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या  आवारात र्धिगाणा घातला होता. मालमत्तेची तोडफोड केली आणि महामार्गावर जोरदार निदर्शने नुकतीच केली होती.  दरम्यान, हिंसाचार केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस महासंचालक गौरव यादव यांनी दिला आहे.
 
कपूरथला जिल्ह्यातील लव्हलीं प्रोफेशनल विद्यापीठाच्या आवारात एका प्लंबरने तीन दिवसांपूर्वी विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा दावा करत  संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलक विद्यार्थी करत होते. त्यांनी विद्यार्थिनींच्या वसतिगृहाबाहेर आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर जोरदार आंदोलन केले. महामार्ग सुमारे १५ तास अडवून ठेवला होता. त्यामुळे  वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून मागर्ं आता खुला केला. दिल्ली आणि अमृतसर महामार्गावर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. तसेच पोलिसांवर दगडफेक केली होती. त्यात अनेक कर्मचारी जखमी झाले होते. जाळपोळीचे प्रकारही घडले होते. 
 
विद्यापीठाचे आवार आणि जालंधर फगवाडा महामार्ग क्रमांक ४४ वर पोलिस बंदोबस्त वाढवला होता. दहा दिवस वर्ग बंद राहतील, असे सांगितल्यानंतर विद्यार्थी बॅगा आणि सुटकेस घेत गावी जात असल्याचे चित्र दिसले.  पालकही मुलांना घेण्यासाठी आले होते. दरम्यान, मुख्यमंत्री भगवंत मान आणि पोलिस महासंचालक गौरव यादव यांनी विद्यापीठाला भेट दिली. तसेच परिस्थितीचा आढावा घेतला.  पंजाब राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. दरम्यान,  यापूर्वी चित्रकला विद्यापीठातील दोन विद्यार्थिनींनी अत्याचारानंतर आत्महत्या केली होती. तेथेही आंदोलन झाले होते. या दोन्ही घटनांचा अहवाल देण्यास आयोगाने सांगितले आहे. 
 
चित्रफित परवानगीशिवाय प्रसारित
 
लव्हली विद्यापीठात कोणताही अत्याचार झाला नाही, असे विद्यापीठाच्या रजिस्ट्रार डॉ. मोनिका गुलाटी यांनी एका चित्रफितीत नमूद केले. तसेच या चित्रफितीत तीन विद्यार्थिनी सांगताना दिसत होत्या की, अत्याचाराची घटना घडलेली नाही. मात्र, आमचे म्हणणे कापून आणि पूर्व परवानगीशिवाय ते विद्यापीठाकडून प्रसारित केले, असा आरोप या विद्यार्थिनींनी केला. प्रकरणाशी काही एक संबंध नसताना आता टीकेला सामोरे जावे लागत आहे. याबाबतची चित्रफित आता समाज माध्यमांवर फिरू लागली आहे. आमची यात काहीही भूमिका नाही, कृपया आम्हाला एकटे राहू द्या, असे त्या चित्रफितीत एका विद्यार्थिनीने सांगितले.
 

Related Articles