नेपाळ हिमप्रपात चौघांचा मृत्यू   

काठमांडू : नेपाळच्या मानंग जिल्ह्यातील हिमलंग हिमाल शिखरावरील हिमप्रपातातींल चौघांचे मृतदेह सापडले आहेत. उर्वरित बारा जणांचा शोध सुरू असल्याची माहिती अधिकार्‍यांनी सोमवारी दिली. 
 
 विरेंद्र गुरांग आणि घनश्याम राय यांचे मृतदेह सोमवारी सापडले अहेत. छेबी भोटे आणि पासंग भोटे यांचे मृतदेह रविवारी सापडले होते, अशी माहिती नेपाळ नॅशनल माऊंटन गाईड असोसिएशनने (एनएनएमजीए) यांनी समाज माध्यमांवरील पोस्टमध्ये दिली. उर्वरित जणांचा शोध युद्धपातळीवर घेतला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  बेपत्ता बारा जणांमध्ये नेपाळी कर्मचारी आणि मार्गदर्शक त्यांचा समावेश आहे. शिखराच्या७ हजार १२६ मीटरवरील नार फुहा बेस कँम्पमधील छावणीवर बर्पाचे लोट कोसळले होते. त्या खाली नऊ गिर्यारोहक आणि १३ कर्मचारी गाडले गेले होते.
 
’द काठमांडू पोस्ट’ ने दिलेल्या वृत्तानुसार, संस्थेचे अध्यक्ष तुल सिंग गुरुंग यांनी सांगितले की, हवामान आणि पर्वतावरील परिस्थिती अनुकूल राहिल्यास  शोधमोहीम पुढे सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. चार मृतदेह सापडले असून त्यांची ओळख पटली आहे. अजूनही बारा जण बेपत्ता आहेत आणि त्यांचा शोध सुरू आहे.
 

Related Articles