E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
ओडिशात एक लाख नागरिक सुरक्षित स्थळी
Samruddhi Dhayagude
29 Sep 2026
बऱ्याच जिल्ह्यांत महानदीला पूर
कोरपट : ओडिशात पूरस्थिती गंभीर बनली असून एक लाखाहून अधिक नागरिकांना मदत छावण्यांत हलवण्यात आले आहे. मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी पूरग्रस्त जिल्ह्यांची हवाई पाहणी केली. तसेच बाधितांना अत्यावश्यक सेवा पुरवण्याचे निर्देश त्यांनी अधिकार्यांना दिले. दरम्यान, हिराकूड धरणातून पाणी मोठ्या प्रमाणात सोडले जात असल्याने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे किनारपट्टीसह सखल भागांत मुसळधार पाऊस पडला आहे. त्यामुळे दक्षिण किनारपट्टी आणि पश्चिम ओडिशातील १३ जिल्ह्यांत पुराचे संकट कोसळले आहे. अनेक ठिकाणी पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. महानदीच्या पाण्यात वाढ होण्याची शक्यता गृहीत धरून पाच त्रिभूज जिल्ह्यांत सावधगिरीचा इशारा देण्यात आला. गंजम, गजपती, मलकानगिरी, कोरापुट आणि नबरंगपूर हे जिल्हे मुसळधार पावसाने प्रभावित झाले; तसेच नद्यांच्या वाढत्या पाणी पातळीमुळे उत्तर ओडिशामधील बालासोर, भद्रक, जाजपूर आणि मयूरभंज जिल्ह्यांतील काही भाग जलमय झाले. सखल भागांतील एक लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवून ५०० हून अधिक मदत केंद्रांमध्ये त्यांना आश्रय देण्यात आला आहे, असे अधिकार्यांनी सांगितले.
हिराकूडमधून पाणी सोडल्याने संकट
ओडिशातील संबळपूर जिल्ह्यात संबळपूरपासून सुमारे १५ किलोमीटरवर जगातील सर्वांत मोठे हिराकूड धरण महानदीवर उभारले आहे. धरणातील पाणी साठवण्याची क्षमता पातळी ६३० फूट आहे. मात्र, आता पातळी ६२८.२९ फुटापर्यंत पोहोचली आहे. छत्तीसगढमधील पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे हिराकूड धरणात पाण्याचा साठा प्रचंड वाढल्याने अतिरिक्त पाणी सोडले जात आहे. पाच लाख क्युसेक या प्रमाणे धरणात पाणी येत आहे. धरणाचे २८ दरवाजे उघडले असून त्यातून ४.४ लाख क्युसेक पाणी सोडले जात आहेत. १९ दरवाजे धरणाच्या डाव्या तर उर्वरित नऊ दरवाजे उजव्या बाजूला आहेत. पूरस्थितीचा फटका जिल्ह्यातील ३.५ लाखांहून अधिक नागरिकांना बसला असून, त्यामध्ये बालासोरमधील ६७ हजार २६६ जणांचा यात समावेश आहे.
Related
Articles
सीजेपीच्या आंदोलनात ममता सहभागी होणार?
09 Oct 2026
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय हॉकी संघ जाहीर
14 Oct 2026
जंतर-मंतरवरील आंदोलनासाठी सीजेपीचा पुन्हा अर्ज
13 Oct 2026
सातार्यात ४१ गावे आणि २४० वाड्या तहानलेल्या
08 Oct 2026
इम्रान खान यांच्या पक्षाचे खैबर पख्तूनख्वामधील सरकार बरखास्त
12 Oct 2026
तुळजाभवानी मंदिरात सुरक्षा कर्मचार्याला पोलिसांकडून मारहाण?
14 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात