E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
सोलापुरात ५७ हजारांहून अधिक गणेशमूर्तींचे विधिवत विसर्जन
Samruddhi Dhayagude
28 Sep 2026
महापालिका व पोलिसांच्या चोख नियोजनात पर्यावरणपूरक निरोप
सोलापूर : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात भावपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात बाप्पाला निरोप देण्यात आला. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेंतर्गत शहरातील विविध संकलन केंद्रांवर एकूण ५७,५०३ गणेशमूर्ती संकलित करण्यात आल्या.
तुळजापूर रोड येथील खाणीवर महापौर विनायक कोंड्याल आणि महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते श्री गणेशमूर्तीचे विधीवत पूजन व आरती करून मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!" या जयघोषात क्रेन आणि बोटींच्या साहाय्याने विसर्जन प्रक्रिया पार पडली.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त विणा पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सहायक आयुक्त मनीषा मगर, नगर अभियंता नीलकंठ मठपती, कार्यकारी अभियंता (विद्युत) राजेश परदेशी, सफाई अधीक्षक अनिल चराटे, उपअभियंता अविनाश वाघमारे, विभागीय अधिकारी श्री. बक्षी, विजय लोखंडे यांच्यासह महापालिकेचे सर्व विभागीय अधिकारी उपस्थित होते.
शहरात ११ विसर्जन कुंडे आणि ४८ संकलन केंद्रे
नागरिकांच्या सोयीसाठी शहरात ६ मुख्य विसर्जन कुंडे, ५ कृत्रिम कुंडे आणि तब्बल ४८ गणेशमूर्ती संकलन केंद्रे उभारण्यात आली होती. तीन फुटांवरील मोठ्या गणेशमूर्तींसह शहरातून संकलित सर्व मूर्तींचे तुळजापूर रोड येथील खाणीत सुरक्षित विसर्जन करण्यात आले. याव्यतिरिक्त विष्णू घाट, गणपती घाट, घरकुल येथील माढा विहीर अशा विविध ठिकाणी नागरिकांनी विसर्जनासाठी गर्दी केली होती. तेथे बॅरिकेडिंग, मंडप, विद्युत रोषणाई आणि स्पीकर आदी सुविधा महापालिकेकडून पुरवण्यात आल्या.
महापालिकेची यंत्रणा सज्ज
विसर्जन सुरळीत पार पाडण्यासाठी महापालिकेने ८ क्रेन, ४ होड्या, ५० ते ५५ वाहने, ३० आरसीएस गाड्या आणि घंटागाड्या तैनात केल्या होत्या. संपूर्ण प्रक्रियेसाठी ४ मुख्य आरोग्य निरीक्षक, ८ आरोग्य निरीक्षक, ५४ सफाई कर्मचारी, ३५० नियमित कर्मचारी आणि सुमारे ८०० मजुरांची नियुक्ती करण्यात आली होती. महत्त्वाच्या ठिकाणी अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथके सज्ज ठेवण्यात आली होती. सुरक्षिततेचा उपाय म्हणून कंबर तलाव, गणपती घाट आणि हिप्परगा खाण येथे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवण्यात आली.
धर्माधिकारी संस्थेकडून ३१ टन निर्माल्य संकलन
पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देत यंदा श्री धर्माधिकारी संस्थेच्या १,८०० स्वयंसेवकांनी विसर्जन स्थळांवरून तब्बल ३१ टन निर्माल्य संकलित केले. स्वयंसेवकांनी भाविकांना निर्माल्य जलस्रोतांमध्ये न टाकता स्वतंत्र जमा करण्याचे आवाहन केले, ज्यास नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. महापौर विनायक कोंड्याल व आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी संस्थेच्या या स्तुत्य उपक्रमाचे विशेष कौतुक करत स्वयंसेवकांचे आभार मानले. सामाजिक संस्थांच्या अशा सहभागामुळे जलप्रदूषण रोखण्यास मोठी मदत झाल्याचे महापौरांनी नमूद केले.
चोख पोलीस बंदोबस्त
विसर्जन मिरवणूक व विसर्जन स्थळांवर कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सोलापूर शहर पोलीस प्रशासनाच्या वतीने कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मार्गांमध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले होते. महापालिका प्रशासन, पोलीस यंत्रणा, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक यांच्या उत्तम समन्वयामुळे सोलापुरातील गणेश विसर्जन सोहळा शांततेत, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक वातावरणात पार पडला.
Related
Articles
अमेरिकेच्या लष्करातील अधिकार्यांची संख्या घटणार
04 Oct 2026
मुंबईच्या रणजी संघातून सूर्यकुमारला वगळले
07 Oct 2026
आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा सपकाळ यांचा आरोप
04 Oct 2026
पोलिस अधिकारी, कर्मचार्यांना साहसी कामगिरीसाठी मुख्यमंत्री शौर्य पदक देणार
07 Oct 2026
चंद्रभागा वाळवंट स्वच्छता अभियानातून १८ टन कचरा संकलित
08 Oct 2026
लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका पुन्हा घ्या : खर्गे
04 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान