नेपाळमध्ये हिमप्रपात; गिर्यारोहकांसह बाराजण बेपत्ता   

काठमांडू : नेपाळच्या मानंग जिल्ह्यातील हिमलुंग हिमाल शिखरावर हिमप्र्रपात झाला आहे.  त्यामध्ये गिर्यारोहक, साहाय्यक कर्मचार्‍यांसह बारा जण बेपत्ता झाले. या घटनेमुळे  महापुराच्या तडख्यातून सावरत असलेल्या नेपाळला पुन्हा नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला. 
 
एक्सपेडिशन ऑपरेटर्स असोसिएशन नेपाळच्या (ईओएन) मते हिमालय हॉलीडेज नेपाळचे आठ जण आणि इमॅजिन नेपाळचे दोन गिर्यारोहक राहात असलेल्या तंबूवर हिमप्रपात झाला होता. यानंतर त्यांच्याशी संपर्क तुटला होताा. हा बेस कँप हिमलुंग हिमाल शिखराच्या ७ हजार १२६ मीटर उंचीवर नार फू परिसरात  होता, अशी माहिती हिमालयन टाईम्स वृत्तपत्त्त्राने दिली. 
 
पर्यटन विभागाचे सरसंचालक राम कृष्ण लामिक्षने यांनी सांगितले की, आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. अधिकारी  सर्व जणांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत आहेत. हिमप्रपातात गाडले गेलेल्याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. 
 
दरम्यान, नेपाळमध्ये मुसळधार पाऊस, पूर आणि महापुराने तांडव सुरू असताना पर्वतीय जिल्ह्यांत दरडी कोसळण्याचे प्रमाणही तितकेच वाढले आहे.  गेल्या गुरुवारपासून मुसळधार पाऊस  पुन्हा सुरू झाला आहे.
 
त्यामुळे पूर आणि दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत; अनेक घरे वाहून गेली असून रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. नेपाळ नैसर्गिक आपत्तीचा सामना अनेक दिवसांपासून करत आहे. आतापर्यत महापुरात १ हजार ४५३ नागरिकांचा मृत्यू झाला असून  पाच हजारांहून अधिक जण बेपत्ताच आहेत. राष्ट्रीय आपत्ती धोका कमी आणि व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार  नेपाळ-तिबेट सीमेजवळ अचानक आलेल्या  पुरामुळे  उत्तर आणि मध्य नेपाळमधील शहरे व गावांचे प्रचंड नुकसान होऊन महिना उलटला आहे. शनिवारपर्यंत एकूण १ हजार ४५१ नागरिकांचे मृतदेह सापडले आहेत. याव्यतिरिक्त, उपचारादरम्यान आणखी दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राधिकरणााने दिली.
 

Related Articles