E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
दक्षिण आफ्रिकेत दोन ठिकाणी गोळीबार; २७ जणांचा मृत्यू
Samruddhi Dhayagude
28 Sep 2026
केपटाऊन : दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग आणि केपटाऊनजवळ सामूहिक गोळीबाराच्या घटना घडल्या. या दोन्ही घटनांमध्ये २७ जणांचा मृत्यू, तर २६ जण जखमी झाले आहेत. दोन्ही घटनांमध्ये संशयित हल्लेखोर फरार असून, पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
जोहान्सबर्गच्या नैऋत्येकडील वेडेला टाउनशिपमध्ये शनिवारी रात्री एका बारमध्ये गोळीबार झाला. आठ संशयित हल्लेखोर एके-४७ रायफल आणि पिस्तुलांसह बारमध्ये आले आणि त्यांनी तेथे उपस्थित नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात १७ जणांचा मृत्यू, तर किमान १५ जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याचदरम्यान, केपटाऊनजवळील ल्वांडले येथे रविवारी पहाटे एकच्या सुमारास दुसरी सामूहिक गोळीबाराची घटना घडली. एका दुकानात झालेल्या या हल्ल्यात १० जणांचा मृत्यू, तर अन्य ११ जण जखमी झाले. या घटनेतील संशयितांची संख्या पोलिसांनी स्पष्ट केलेली नाही. मात्र, संशयितांचा शोध घेतला जात आहे. दोन्ही घटनांमध्ये अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.
दरम्यान, या दोन घटनांच्या काही दिवस आधी डर्बनजवळील एका घरातील पार्टीतही गोळीबार झाला होता. तीन हल्लेखोरांनी केलेल्या या गोळीबारात ११ जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये एका गर्भवती महिलेचाही समावेश होता. या आठवड्यात झालेल्या सामूहिक गोळीबाराच्या घटनांमुळे दक्षिण आफ्रिकेत चिंता वाढली आहे.
Related
Articles
विधान परिषद निवडणुकीत महायुतीत बंडाचे झेंडे
04 Oct 2026
पाकिस्तानात पिठाच्या किमती भडकल्या
09 Oct 2026
पिके करपली, जमिनीला भेगा...
03 Oct 2026
आशियाई क्रीडा स्पर्धेचा शानदार समारोप
05 Oct 2026
पूर्वजांचे स्मरण
04 Oct 2026
इंडिगोच्या विमानावर कोसळली वीज
09 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान