E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
इंग्लंडमधील अमेरिकन हवाई तळाजवळची घरे केली रिकामी
Samruddhi Dhayagude
28 Sep 2026
लंडन : इंग्लंडमधील एका अमेरिकन हवाई तळाजवळ पोलिसांनी अनेक घरे रिकामी केली असून, स्फोटकांशी संबंधित गुन्ह्यांच्या संशयावरून काही जणांना ताब्यात घेतले आहे. पश्चिम इंग्लंडमधील व्हेलफोर्ड परिसरात ही कारवाई करण्यात आली.
व्हेलफोर्डमधील अनेक मालमत्ता खबरदारीचा उपाय म्हणून रिकाम्या करण्यात येत आहेत. हा परिसर आरएएफ फेअरफोर्ड या अमेरिकी लष्कराकडून वापरल्या जाणार्या हवाई तळाच्या जवळ आहे. स्फोटकांशी संबंधित गुन्हे केल्याच्या संशयावरून या परिसरातील अनेक व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईदरम्यान लष्कराच्या बॉम्ब निकामी पथकातील तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे.
बॉम्बविरोधी तज्ज्ञांकडून परिसरातील अनेक वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. पोलिसांकडून परिस्थितीचा तपास सुरू असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी परिसरातील काही मालमत्ता रिकाम्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, आरएएफ फेअरफोर्डचा अमेरिकी लष्कराकडून वापर केला जातो. या हवाई तळाचा वापर इराणसोबतच्या युद्धाच्या काळातही करण्यात आला आहे.
Related
Articles
भारतीय मसाल्यावरील आयात शुल्कात कपातीची अमेरिकन व्यापार्यांना आशा
08 Oct 2026
पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत एकनाथ स्वाभिमानी सेनेचा बहिष्कार
13 Oct 2026
नायजेरियात लष्करी तळावर बंडखोरांचा हल्ला; १० सैनिकांचा मृत्यू
09 Oct 2026
बँक ठेवी आणि शेअर्सची माहिती आता एकाच विवरणपत्रात
12 Oct 2026
आंबेगाव तालुक्यात शनिवारी भाद्रपद बैलपोळा
08 Oct 2026
अमेरिकेत नोकरी महागणार; मोजावे लागणार ६८ लाख
09 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात