E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
दक्षिण चीन समुद्रात चीन-फिलिपिन्स पुन्हा आमनेसामने
Samruddhi Dhayagude
28 Sep 2026
ब्रह्मोस तैनातीमुळे तणाव वाढला
मनिला : दक्षिण चीन समुद्रातील वादग्रस्त भागावरून चीन आणि फिलिपिन्समधील तणाव पुन्हा वाढला आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही देशांच्या नौदल आणि तटरक्षक दलांमध्ये आमनेसामने येण्याच्या घटना वाढत आहेत. विशेष म्हणजे, फिलिपिन्सने आपल्या किनारपट्टीच्या संरक्षणासाठी भारताकडून खरेदी केलेली ब्रह्मोस सुपरसॉनिक जहाजविरोधी क्षेपणास्त्र प्रणाली तैनात केली आहे. त्यामुळे या सागरी वादाला आता सामरिक आणि लष्करी आयामही मिळाला आहे.
फिलिपिन्सच्या म्हणण्यानुसार, चिनी नौदल आणि तटरक्षक दलाने सेकंड थॉमस शोल येथे तैनात असलेल्या फिलिपिन्सच्या जवानांसाठी करण्यात येणार्या नियमित रोटेशन आणि पुरवठा मोहिमेत अडथळा आणला. चिनी जहाजांनी धोकादायक पद्धतीने मार्ग अडवल्यामुळे ही मोहीम काही काळ थांबवावी लागल्याचा आरोप फिलीपिन्सने केला आहे.दक्षिण चीन समुद्रातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर फिलिपिन्सने भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी केली आहे. २०२२ मध्ये दोन्ही देशांमध्ये ३७.५ कोटी डॉलरचा करार झाला होता.
चिथावणी दिल्याचा चीनचा आरोप
चीनने फिलिपिन्सवर आपल्या प्रादेशिक सागरी हद्दीत चिथावणीखोर कारवाया केल्याचा आरोप केला आहे. फिलिपिन्सने चिनी बेटे आणि प्रवाळ बेटांच्या आसपास आपल्या हालचाली वाढवल्या आहेत. चिनी तटरक्षक दल या हालचालींना रोखण्यासाठी कारवाई करत राहील, असे चीनकडून सांगण्यात आले. सेकंड थॉमस शोलवरील फिलिपिन्सच्या उपस्थितीलाही चीनने आक्षेप घेतला आहे. मानवतावादी कारणांसाठी काही पुरवठा मोहिमांना परवानगी दिली जाऊ शकते; मात्र या ठिकाणी नवीन कायमस्वरूपी संरचना उभारण्यास किंवा विद्यमान संरचना मजबूत करण्यास फिलिपन्सला परवानगी दिली जाणार नाही, अशी भूमिका चीनने घेतली आहे.
Related
Articles
दुष्काळग्रस्त भागातील पात्र लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य
09 Oct 2026
मुख्य निवडणूक अधिकार्यांच्या कार्यालयाबाहेर ‘आप’चे आंदोलन
08 Oct 2026
वाचक लिहितात
12 Oct 2026
जगाची व जगण्याची जाण असलेला ‘क्रांतीवीर’ अभिनेता
09 Oct 2026
महिला नेत्यांसाठी एआय आधारित नवे व्यासपीठ
09 Oct 2026
चंद्रभागा वाळवंट स्वच्छता अभियानातून १८ टन कचरा संकलित
08 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात