E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
रशियन सैन्याविरोधात युक्रेनची ‘रोबोट आर्मी’
Samruddhi Dhayagude
28 Sep 2026
धोकादायक मोहिमांसाठी मानवरहित यंत्रांचा वापर
कीव्ह : रशिया-युक्रेन युद्धात मानवरहित तंत्रज्ञानाचा वापर आणखी व्यापक करण्याच्या दिशेने युक्रेनने पाऊल टाकले आहे. सैनिकांचा जीव धोक्यात न घालता युद्धभूमीवरील उच्च-जोखमीची कामे पार पाडण्यासाठी ‘रोबोट आर्मी’ उभारण्याच्या उपक्रमाची घोषणा युक्रेनचे नेते मिखाइलो फेडोरोव्ह यांनी ‘आयटी एरिना २०२६’ परिषदेत केली. ड्रोनच्या माध्यमातून युद्धतंत्रात झालेल्या बदलानंतर आता रोबोटिक्सचा वापर वाढवण्याचा युक्रेनचा प्रयत्न आहे.
फेडोरोव्ह यांच्या नेतृत्वाखाली या प्रकल्पासाठी संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या, अभियंते आणि तांत्रिक तज्ज्ञांना सहभागी करून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संशोधन, विकास, चाचण्या आणि तंत्रज्ञानाचे जलद उत्पादन यासाठी खासगी क्षेत्राच्या सहभागातून स्वतंत्र परिसंस्था उभारण्यावर भर देण्यात येत आहे.
युद्धभूमीवर रोबोटिक यंत्रांचा वापर जखमी सैनिकांना सुरक्षित ठिकाणी हलवणे, दारुगोळा पोहोचवणे, टेहळणी करणे, सुरुंग पेरणे तसेच काही लष्करी मोहिमा पार पाडण्यासाठी करण्याचे नियोजन आहे. या कामांमध्ये मानवी सैनिकांना थेट धोका निर्माण होण्याची शक्यता अधिक असल्याने मानवरहित यंत्रांचा वापर करण्यामागे जवानांचे जीव वाचवणे हा प्रमुख उद्देश आहे.युक्रेनने यापूर्वी ड्रोन तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करून युद्धभूमीवरील कारवायांची पद्धत बदलली आहे.
Related
Articles
कात्रज-कोंढवा रस्त्यावर रात्रभर पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट
08 Oct 2026
महिला नेत्यांसाठी एआय आधारित नवे व्यासपीठ
09 Oct 2026
महागाईचा रेटा (अग्रलेख)
09 Oct 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना शुल्कमाफीचा आधार; विद्यापीठांत मदतीसाठी स्वतंत्र यंत्रणा
14 Oct 2026
महापौरांकडून दोन डॉग कॅचिंग वाहने खरेदीचे आदेश
08 Oct 2026
‘आस्था’ महिलांसाठी हक्काचं घर
13 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात